Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

Subsidy Update : अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदान कधी मिळणार, ता विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत.

Team Agrowon

Solapur News : राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या एका महिन्याच्या कालावधीकरिता दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. पण अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदान कधी मिळणार, ता विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दूध अनुदान वाटपाचा एक महिन्याचा कालावधी संपला असून, ११ फेब्रुवारीपासून परत गायीच्या दुधाचा दर ३.५ फॅटसाठी २७ रुपये झाला आहे. काही संस्थांनी दुधाचा दर २६ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे दूध अनुदान वाटप शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरले आहे. अजून कुठल्याच दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्‍न ‘जैसे थे’च राहिला आहे.

अनुदान कालावधी वाढवण्याची मागणी

जाहीर केलेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, शिवाय दुधाला नैसर्गिकरीत्या दरात वाढ मिळत नाही तोपर्यंत दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

आधीच वैरण आणि पशुखाद्यावरील खर्चात मोठी वाढ झाली असल्याने दूध व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनुदान कालावधी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांचे दूध व्यवसायातील आर्थिक गणित जुळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

म्हशीच्या दूध दरात घसरण

गायीच्या दूध दराचा प्रश्न मिटला नसताना, म्हशीचा दूध दरात १ फेब्रुवारीपासून एक रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे म्हशीच्या दूध दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपला आहे. नव्याने अनुदान वाटपाचा कालावधी वाढवायला हवा, असे दूध संस्थांचे मत आहे. शासनाकडून आमच्या संघाला दूध अनुदान केव्हा मिळणार आहे किंवा अनुदान वाटप कालावधी वाढेल का, याबाबत कोणत्याही सूचना आल्या नाहीत.
विजयकुमार गलांडे, दूध संकलन अधिकारी, वारणा दूध संघ, शाखा जत
जोपर्यंत दुधाला नैसर्गिकरीत्या दर मिळत नाही, तोपर्यंत राज्य शासनाने दूध अनुदानवाटपाचा कालावधी वाढवायला हवा. शिवाय जाहीर केलेले अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करावे. नाहीतर प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारले जाईल.
संतोष पवार, जिल्हा युवक अध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, सोलापूर
शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान अजून मिळाले नाही. दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपल्याने २५ ते २६ रुपयाने दूध दर मिळत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने लवकरात लवकर दूध अनुदान जमा करावे व दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवावा.
सागर धायगोंडे, दूध उत्पादक शेतकरी, सलगर बुद्रूक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT