Milk Subsidy : दूध अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

Department of Animal Husbandry and Dairy Development : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ खाजगी प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर रुपये ५ अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे.
Milk Subsidy
Milk SubsidyAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ खाजगी प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर रुपये ५ अनुदान देण्याची योजना ता. ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने संबंधित संघ व खाजगी प्रकल्प यांनी ३.५ फॅट / ८.५ एस.एन.एफ. या गुणप्रतिच्या दुधासाठी प्रति लीटर २७ रुपये दर देणे आवश्यक असून कमीत कमी ३.२ फॅट/८.३ एस.एन.एफ. पर्यतच्या दुधासाठी अनुदान योजना लागू असणार आहे.

Milk Subsidy
Milk Subsidy : इअर टॅग नसल्याने दूध उत्पादकांसमोर अडचणी

३.५/८.५ या गुणप्रतिपेक्षा कमी/जास्त होणाऱ्या फॅट व एस.एन.एफ.साठी प्रत्येकी ३०पैसे वाढ/वजावट करणे आवश्यक आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून अनुदान पात्र गाय दुधासाठीचे प्रति लीटर रुपये ५ अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डिबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहेत.

यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते, आधारकार्ड व इयर टॅगशी जोडलेले असणे तसेच त्याची INAPH/भारत पशुधन पोर्टल वर नोंदणी आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी प्रकल्प, शीतकरण केंद्रे आणि फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्याकरिता अर्ज सादर करता येतील.

Milk Subsidy
Milk Subsidy : गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान

प्राप्त अर्जाची तपासणी करुन खालील तक्त्यात दर्शविल्यानुसार अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. अनुदान योजनेपासून विभागातील सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांना दूध पुरवठा करणारे एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये. यासाठी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाशी संपर्क साधावा.

तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत छत्रपती संभाजीनगर विभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाय/ म्हैस यांचे इयर टॅगिंग करण्याची मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी सर्व दूध उत्पादक शेतकरी यांनी आपापल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. याद्वारे सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांनी प्रकल्पांना आवश्यक माहिती देवून आपल्या जनावरांचे इयर टॅगींग करुन घेवून या योजनेचा लाभ घेण्याचे, आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com