Milk Subsidy : दूध अनुदानाची प्रतीक्षा महिनाभरानंतरही कायम

Milk Rate : दुधाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान देण्याची सरकारकडून घोषणा करण्यात आली.
Milk Subsidy
Milk SubsidyAgrowon
Published on
Updated on

Nagar News : दुधाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान देण्याची सरकारकडून घोषणा करण्यात आली. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

दूध संकलन केंद्र, दूध खरेदीदार संघाकडून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ॲपमध्ये भरली नसल्याने अनुदान कसे द्यायचे, असा प्रश्‍न दुग्धविकास विभागासमोर आहे. अनुदान मिळणार मात्र ते कधी मिळणार याची स्पष्टता नाही. ‘एसएनएफ व फॅट’ची अट अडचणीची ठरणार असल्यानेही शेतकरी हतबल आहेत.

राज्यात दर दिवसाला गाईचे सव्वादोन ते अडीच लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील ४० टक्क्यांच्या जवळपास दुधाची विक्री होते. मागील काही दिवस दुधाला ३८ ते ३९ रुपये प्रतिलिटर दर मिळाला. मात्र मागील सहा महिन्यांपासून दुधाच्या दरात टप्प्या टप्प्याने घट झाली आहे. त्यामुळे उत्पादकांची अंदोलने झाली. त्याची दखल घेऊन सरकारने प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.

Milk Subsidy
Milk Subsidy : दूध अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

खासगी व सहकारी दुध संघाने गाईच्या दुधाला ‘३.५ फॅट व ८.५ एसएनएफ’ ला प्रतिलिटर २७ रुपये दर किंवा ३.५ फॅट व ८.५ ‘एसएनएफ’ला २५ रुपये ५० पैसे दर दिला तर शासनाकडून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे. अकरा जानेवारीपासून हे अनुदान दिले जाणार होते. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून दुभत्या जनावरांना टॅगिंग केले आहे.

आता शेतकऱ्यांकडील दुभत्या गाईच्या संख्येसह इतर जनावरे, संकलित दूध, टॅगिंग शिक्क्याचा नंबर जवळपास साठ मुद्यांची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने विकसित केलेल्या ‘ॲप’मधून भरून ती माहिती दुग्धविकास विभागाकडे गेल्यावर अनुदान मिळेल.

Milk Subsidy
Milk Subsidy : दूध अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

कोणत्या शेतकऱ्यांना किती पेमेंट केले व किती रुपये लिटर दराने केले, याचा डाटा दूध संकलन केंद्र चालकाने संघाला व संघाने दुग्ध विभागाला द्यायचा आहे. त्यानंतर अनुदान मिळेल. मात्र अजून ही माहितीच दूध संकलन केंद्र, खासगी व सहकारी दूध संघाने भरली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी दूध उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवाय ज्या दुधाला कमी दर दिला, त्या संबंधित उत्पादकांना अनुदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

फॅट लावणार कशी?

गाईच्या दुधाला ‘३.५ फॅट व ८.५ एसएनएफ’ला प्रतिलिटर २७ रुपये दर किंवा ३.५ फॅट व ८.५ ‘एसएनएफ’ला २५ रुपये ५० पैसे दर दिला तर शासनाकडून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळेल. मात्र शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही या नियमानुसार फॅट व एसएनएफ लागत नाही.

त्यामुळे २७ रुपये अथवा २५ रुपये ५० पैसे दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फॅट व एसएनएफ कसा लावायचा? याची चिंता शेतकऱ्यांना आहे. शिवाय पशुखाद्याचे दरही अजून कमी केले नाहीत.

दूध अनुदानासाठी अजून अनेक शेतकऱ्यांचा डाटाच तयार नाही. काही संघ २५ ते २६ रुपये दर देत आहेत. कमी दर मिळाला तर अनुदानही मिळणार नाही. शेतकऱ्यांनी विचारले तर संघाकडून तसे सांगितले नसल्याचे दूधसंकलन केंद्र चालक सांगत आहेत. ‘फॅट व एसएनएफ’ची आणि दराच्या अटींमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या अटी काढाव्यात.
- नंदू रोकडे, दूध उत्पादक, खडकी, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com