Nanded Earthquake  Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Earthquake : नांदेड जिल्ह्यासह हदगाव आणि हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के

Earthquake Update : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) दिली.

Roshan Talape

Nanded News : नांदेड जिल्ह्यात काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) एक्सवर ट्विट करत दिली आहे. मंगळवारी (ता. २२) सकाळी जिल्ह्यातील (ता. हदगाव) सावरगाव आणि मनाठा गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या तीव्रतेची ३.१ रिश्टर स्केलवर नोंद झाल्याचं एनसीएसने स्पष्ट केले आहे.

स्थानिक नागरिकांना सकाळी ६.५२ च्या सुमारास हे धक्के जाणवले आहे. या भूकंपाच्या धक्क्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. परंतू नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पश्चिमेस असलेले सावरगाव हे या भूकंपाचे केंद्र बिंदू दाखवत आहे. भूकंपाचे केंद्र १९.३८ अंश उत्तरी अक्षांश आणि ७७.४६ अंश पूर्वी देशांतर असे, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली ५ किलोमीटर खोलीवर आढळले आहे. भूवैज्ञानिक विभागाच्या मते, या प्रकारचे सौम्य भूकंप सामान्यतः कमी नुकसानकारक असतात, पण तरीही स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

National Center for Seismology Tweet

आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज!

जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोलीतील संबंधित अधिकाऱ्यांना देखील सतर्कतेचे निर्देश दिले असून, येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारच्या आकस्मिकतेसाठी आवश्यक तयारी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकासह जिल्ह्यातील विविध विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व स्तरांवर तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मार्च महिन्यातच विविध ठिकाणी ४.५ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण आता पुन्हा एकदा नांदेड भूकंपाने थरारले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग

Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच

Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी

Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग

Tiger Terror : वाघाच्या दहशतीने शेतीकामेच रखडली

SCROLL FOR NEXT