Jalna News : महसूल विभागामार्फत राज्यात महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनमध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन’ कार्यक्रम प्रात्यक्षिकांसह सोमवारी (ता. १२) आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशीकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यासागर, जिल्हा संघटक (स्काऊट) केसरसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाअंतर्गत अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांतील अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता प्राथमिक आगीपासून बचावाबाबत मागर्दशन करण्यात आले.
घरगुती व प्राथमिक स्वरूपाची आग कशी विझवावी, आगीमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन तर प्राथमिक स्वरूपाची आग विमोचन व अग्निशमन विभागातील विविध साहित्याद्वारे आगीवर नियंत्रण कसे मिळवले जाते याबाबत प्रात्यक्षिक करण्यात आले. अधिकारी/कर्मचारी तसेच स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्र हाताळण्याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
पूरपरिस्थितीत नावेचा कशा प्रकारे वापर होतो, पूर परिस्थितीत सामान्य नागरिकांनी कोणकोणती दक्षता घ्यावी, यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात विविध आपत्तीमध्ये उपयोगात येणारे शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या साहित्याच्या उपयोगाबाबत माहिती देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.