Weather Update
Weather Update Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : सौम्य थंडी, कोरड्याहवामानाची शक्‍यता

 डॉ. रामचंद्र साबळे 

या आठवड्यात महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल ते १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब (Air Pressure) राहील. कमाल व किमान तापमानात (Temperature) वाढ होते, तेव्हा हवेचे दाब कमी होतात. त्याचा थेट परिणाम थंडीवर होतो. त्यामुळे या आठवड्यात सौम्य थंडी व कोरडे हवामान राहणे शक्‍य आहे. बहुतांशी जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील.

सातारा, सोलापूर, उस्मानाबाद व नगर जिल्ह्यांत आज व उद्या (ता.४, ५) अल्प ते अत्यल्प पावसाची शक्‍यता निर्माण होईल. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण मध्यम राहील. आज (ता. ४) अंदमान व निकोबार समुद्रात चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात होईल. हे वारे उद्या (ता. ५) बंगालच्या उपसागरात दाखल होतील व तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. मंगळवार व बुधवारी (ता. ६, ७) त्याचे लहानशा चक्रीय वादळात रूपांतर होईल. पुढे गुरुवारी (ता. ८) ते आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकून नंतर विरून जाईल. त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवणार नाही.

उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहील; मात्र दक्षिण भारतात थंडीचे प्रमाण तुलनेने कमी राहील. हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. विदर्भात दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे थंडीची तीव्रता कमी राहील. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे किमान तापमानातील घट कायम राहून थंडीचे प्रमाणही चांगले राहील.

कोकण ः
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ७५ ते ८० टक्के, तर ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांत ५० ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५० ते ५३ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४० ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ३२ टक्के, जळगाव जिल्ह्यात ३४ टक्के, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २४ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ किमी व दिशा ईशान्येकडून राहील.

मराठवाडा ः
औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८० टक्के, तर औरंगाबाद, जालना व हिंगोली जिल्ह्यांत ५० ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद व हिंगोली जिल्ह्यांत ३० ते ३९ टक्के, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ४० ते ४७ टक्के इतकी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहणे शक्‍य आहे.

पश्‍चिम विदर्भ ः
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४६ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३० ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ ः
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ ः
कमाल तापमान भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५३ ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे २१ ते २५ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान पुणे जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ८० टक्के, तर पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ७० ते ७७ टक्के राहील. नगर जिल्ह्यात ती ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ५० ते ५१ टक्के, तर नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत ४१ ते ४६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग पुणे व नगर जिल्ह्यांत ४ ते ५ किमी, तर कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ७ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला ः
- भाजीपाला पिकांमध्ये खुरपणी करून तणनियंत्रण करावे.
- हरभरा पिकामध्ये घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे लावावेत.
- जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा.
- फळबागांमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटेच्या वेळी सिंचन करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT