Greek agriculture crisis : मागील तीन वर्षांपासून युरोपियन महासंघातील अनेक देशांमध्ये कधी स्वस्त शेतमाल आयातीमुळे तर कधी रखडलेल्या अनुदानांमुळे शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. ग्रीसमधील आंदोलनही याच पार्श्वभूमीवर अधिक उग्र झाले असून, शेतकऱ्यांचा रोष इतका वाढला आहे की सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याचे चित्र आहे.