Dairy Business: दूध व्यवसायातून साधली अल्पभूधारकाने प्रगती
Small Farmer Success: सावरगाव तळ (ता. संगमनेर) येथील कुणाल विक्रम फापाळे या तरुण शेतकऱ्याने दोन गाईंपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय टप्प्याटप्प्याने वीस गाईंपर्यंत पोहोचला आहे. चारा, पाणी व्यवस्थापन, दर्जेदार सिमेन्सचा वापरातून दूध उत्पादनात वाढ केली आहे. अल्पभूधारक असूनही दूध व्यवसायाच्या जोरावर कुटुंबाने उत्तम प्रगती साधली आहे.