Chandrapur News : खरीप हंगाम आणि शेतीची कामेही संपुष्टात आल्याने पूर्वी कामाच्या शोधात शेत मजुरांचे स्थलांतरण होत होते. आता मात्र मनरेगातून गावस्तरावरच कामाची उपलब्धता होत असल्याने तब्बल ३४ हजार ६०५ शेतमजुरांचे स्थलांतरण रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा देखील धान लागवड व उत्पादनासाठी ओळखला जातो. धान शेतीत हंगामी कामांची उपलब्धता कमी राहते. त्यामुळेच शेतीचा हंगाम संपल्यानंतर या कामावर असलेल्या मजुरांना दुसऱ्या कामाच्या शोधार्थ स्थलांतरण करावे लागते. सिंचनाच्या मर्यादा असल्याने धानाचे एक पीक निघाले की, ग्रामीण, आदिवासी भागात रोजाराची समस्या डोके वर काढते, असे दर वर्षीचे चित्र आहे.
शेतीवर अवलंबून असलेला हा समुदाय रोजगाराविना हतबल होतो. उत्पादनक्षम मनुष्यबळाच्या कौशल्याचा वापर व्हावा याकरिता तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. आज हीच योजना या मजुरांचे स्थलांतरण रोखण्यात महत्त्वाची ठरली आहे. याच मनरेगाअंतर्गंत चंद्रपूर जिल्ह्यात दोन हजार १७ कामांवर ३४ हजार ६० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळेच स्थलांतरण करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही.
चिमूर तालुक्यात सर्वाधिक कामे
चिमूर तालुक्यात सर्वाधिक ३३२ कामे सध्या सुरू आहेत. नागभीड १३१, सिंदेवाही २९४, चिमूर ३३२, मूल १२५, ब्रह्मपुरी २४३, पोंभुर्णा ९१, जिवती १२६, सावली १८८, भद्रावती ७४, गोंडपिपरी १०३, वरोरा १३९, चंद्रपूर ८०, राजुरा ६०, बल्लारपूर ५३ व कोरपना तालुक्यात ५८ कामे सुरू आहेत.
अशी आहे मजूर संख्या
नागभीड ६७९७
सिंदेवाही ४८७७
मूल ४०९१
ब्रह्मपुरी २४३२
जिवती १५०४
सावली १४५१
भद्रावती १२६९
गोंडपिपरी १०६०
वरोरा ७२४
चंद्रपूर ६२२
राजुरा ५८१
बल्लारपूर २३९
कोरपना १६९
एकूण ३४,६०७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.