MGNREGA Scheme : मनरेगा अंतर्गत १ हजार २६२ हेक्टरवर फळबाग लागवड

Rural Employment Guarantee Scheme : परभणी जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १ हजार २२० हेक्टरवर होते.
MGNREGA
MGNREGAAgrowon
Published on
Updated on

Rojgar Hami Yojana Parbhani : परभणी जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १ हजार २२० हेक्टरवर होते. मार्च अखेर १ हजार ४८० लाभार्थी शेतकऱ्यांनी १ हजार २६२.७८ हेक्टरवर (१०४ टक्के) फळबाग लागवड केली आहे.

या कामांवर २ कोटी ३४ लाख २३ हजार रुपये खर्च झाला आहे. यंदा (२०२३-२४ ) मनरेगा अंतर्गत १ हजार ५०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यानुसार २०२२-२३ मध्ये मनरेगा अंतर्गत फळबाग तसेच फुलझाडे लागवडीसाठी १ हजार २२० हेक्टर क्षेत्राचा लक्षांक होता. जिल्ह्यातील २६४ कृषी सहाय्यक आहेत. सर्व ९ तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५ हजार ११६ अर्ज प्राप्त झाले.

त्याअनुषंगाने ४ हजार ३९७.१३ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते. एकूण ४ हजार ८५८ शेतकऱ्यांना ४ हजार २७०.३८ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४ हजार ८५१ शेतकऱ्यांना ४ हजार २६३.३८ हेक्टरवर लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती.

MGNREGA
Employment Guarantee Scheme : मजूरांना 'रोजगार हमी योजने'चा मिळतोय आधार

एकूण १ हजार ४८१ शेतकऱ्यांनी १ हजार २६३.७८ हेक्टरवर लागवडीसाठी खड्डे खोदले आहेत. प्रत्यक्षात १ हजार ४८० शेतकऱ्यांनी १ हजार २६२.७८ हेक्टरवर विविध फळपिके तसेच फुलझाडांची लागवड केली. २ कोटी ३४ लाख रुपयावर खर्च...

परभणी तालुक्यात ३७ लाख ७० हजार रुपये, जिंतूर ७१ लाख ७८ हजार रुपये, सेलू १२ लाख ९५ हजार रुपये, मानवत ११ लाख रुपये, पाथरी १३ लाख ६३ हजार रुपये, सोनपेठ ९ लाख ४० हजार रुपये, गंगाखेड २६ लाख ३० हजार रुपये, पालम २४ लाख ९५ हजार रुपये, पूर्णा २६ लाख ५२ हजार रुपये असा एकूण २ कोटी ३४ लाख रुपये निधी खर्च झाला, असे सूत्रांनी सांगितले.

मनरेगाअंतर्गंत २०२२-२३ मधील फळबाग लागवड स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका - लक्षांक- लागवड क्षेत्र - लाभार्थी शेतकरी

परभणी - २२० - ३०३.००- ३४८

जिंतूर - २२० - १७५.८८- २३९

सेलू - ११५- ५८.१५- ६३

मानवत - ११५- १३४.११- १५०

पाथरी - ११० - १०२.७०- ११५

सोनपेठ - ११०- ९५.६०- १०२

गंगाखेड- ११०- १३३.९५ - १६१

पालम - ११० - ११९.५० - १४३

पूर्णा- ११०- १३७.९४१- १६१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com