Mhaisal Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation Scheme : ‘म्हैसाळ’चे बिल टंचाई निधीतून

Electricity Bill of Mhaisal Irrigation : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. योजना सोलरवर सुरू होणार आहे. सध्या मात्र वीज बिल शासनाच्या टंचाई निधीतूनच भरले जाईल.

Team Agrowon

Kolhapur News : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. योजना सोलरवर सुरू होणार आहे. सध्या मात्र वीज बिल शासनाच्या टंचाई निधीतूनच भरले जाईल.

शेतकऱ्यांनी वीजबिल भरू नये, तशा सूचना अधिकाऱ्यांना देऊ, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बेडग (ता. मिरज) येथील कार्यक्रमात सांगितले. मॉडेल स्कूल, व्यायामशाळा अशा विविध विकास कामांचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘म्हैसाळ योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त ठरला. मागणीनुसार वापरण्यात येणाऱ्या पाण्याची वीजबिले शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येतात. मोफत पाणी सोडण्याची मागणी दरवर्षी करण्यात येते. मात्र सक्तीने वसुली करून वीजबिल भरण्यात येते.

सध्या वीजबिल आकारणी ८१ - १९ टक्केचा फॉर्म्यूला वापरून करण्यात येत होते. ८१ टक्के वीजबिल शासकीय निधीतून व उर्वरित १९ टक्के वीजबिल शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येते. दुष्काळ स्थितीमुळे योजनेचे आवर्तन सुरू आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तलाव, विहिरी भरून घ्यावे.’’

दुष्काळ जाहीर झाला आहे. म्हैसाळच्या पाण्यासाठी कोणीही पैसे भरू नयेत. मागणीनुसार पाणी मोफत सोडण्यात येईल, अशा सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे खाडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT