Maharashtra Electricity Regulatory Commission Agrowon
ॲग्रो विशेष

MERC Complaints Portal Issue: एमईआरसीच्या वीज दरवाढीच्या तक्रारींच्या वेबसाइट बंद; नागरिकांमध्ये असंतोष

Power Tariff Hike Website Issue: महावितरण वीज दरवाढीच्या प्रस्तावावर नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्याचे संकेतस्थळ, ‘एमईआरसी’च्या वेबसाईटवर काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रारी दाखल करण्यात अडचणी येत असून, यावर मुदतवाढीची मागणी केली जात आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरण विभागाने सुचविलेल्या वीज दरवाढीबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहे. त्या हरकती ऑनलाइन मागविल्या असून त्याची नोंदणी ‘एमईआरसी’च्या संकेतस्थळावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

मात्र, मागील काही दिवसांपासून हे संकेतस्थळ बंद असल्याची माहिती समोर आली आहे. या विरोधात नागरिकांना हरकती नोंदविण्यास अडचणी येत असल्याने ही मुदत वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महावितरण वीज कंपनीने राज्य नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या पंचवार्षिक वीज दर वाढीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीसाठी तक्रारी नोंदविण्याचे आवाहन www.merc.gov.in या संकेतस्थळावर एक फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. त्यासाठी १७ फेब्रुवारी हा अंतिम मुदत होती.

परंतु मागील पाच ते सहा दिवसांपासून तक्रारीची ही वेबसाइट बंद आहे. त्यामुळे नागरिकांना सूचना, हरकती नोंदविताना अडचणी येत आहेत. त्यातच ही संधी मिळत नसल्याने ग्राहकाकडून असंतोष व्यक्त केला जात आहे, अशी माहिती दि. सोलार सिस्टिम इंटिग्रेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयंत व्ही राव यांनी दिली.

महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत वाकडे म्हणाले, की सध्या शासनाने वीज दर वाढविण्यासाठी एमईआरसीच्या माध्यमातून जाहीर सूचना न्यूज पेपरच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सूचना, हरकती नोंदविल्यानंतर त्याची जनसुनावणी राज्यभर केली जाणार आहे.

यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा सहा ठिकाणी २५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत केल्या जाणार आहेत. त्यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा विचार करून पुढील पाच वर्षांसाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येणार आहे. ही दरवाढ दर वर्षी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खर्चामध्ये वाढ होऊन आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

वीज दरवाढीच्या ज्या हरकती मागविल्या आहेत. त्याचे संकेतस्थळ बंद असल्याने नोंदविता येणार नसल्याने ही दरवाढ केली जाणार असल्याने जवळपास नक्की आहे. फक्त हा एक फार्स असून या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा या माध्यमातून देण्यात येत आहे.
जयेश अकोले, अध्यक्ष, दि. सोलार सिस्टिम इंटिग्रेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: आश्चर्याचा धक्का! उमरग्यात शिंदेसेनेची चक्क काँग्रेसशी युती, 'बुडाखालील अंधार' म्हणत दानवेंचे टीकास्त्र

Organic Farming: सेंद्रिय शेतीस शासनाचे ठोस पाठबळ आवश्यक

Farmer Safety: शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी दिवसा वीजपुरवठा करा

Jowar Distribution: अंत्योदय, ‘पीएचएच’ कुटुंबांसाठी ज्वारीचा अतिरिक्त साठा

Ravindra Chavan: 'महायुती'त धुसफूस! २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची, नंतर...; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT