Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation 2026: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील (सर्वसाधारण) महिलेसाठी आरक्षित झाले आहे. याआधीही मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होते. आता मुंबईत तिसऱ्यांदा खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निघाले आहे. .नवी मुंबई, वसई- विरार, भिवंडी-निजामपूर, मीरा- भाईंदर, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नांदेड, धुळे, मालेगाव, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर आणि परभणी महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे एकूण १७ महागनरपालिकेतील महापौर खुल्या प्रवर्गातून म्हणजेच सर्वसाधारण गटातील होईल..ठाण्यात अनुसूचित जाती, कल्याण-डोबिंवली- अनुसूचित जमाती (पुरुष), उल्हासनगर- ओबीसी- महिला किंवा पुरुष, अहिल्यानगर- ओबीसी (महिला), अकोला- ओबीसी (महिला), लातूर- अनुसूचित जाती (महिला), चंद्रपूर- ओबीसी (महिला), कोल्हापूर- ओबीसी (महिला किंवा पुरुष), इचलकरंजी- ओबीसी (महिला किंवा पुरुष), जालना- अनुसूचित जाती (महिला), पनवेल- ओबीसी (महिला किंवा पुरुष) आरक्षण जाहीर झाले आहे. .Municipal Elections: महापालिकेत स्वबळावर लढून भाजप पुन्हा सत्तेत .असे आहे २९ महानगरपालिकांच्या महापौरपदांसाठीचे आरक्षणसर्वसाधारण - १७अनुसूचित जमाती - १ अनुसूचित जाती -३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - ८ .Municipal Elections: राष्ट्रवादी, शिवसेनेसह काँग्रेसला आत्मपरीक्षणाची वेळ.29 Municipal Corporations Mayor Reservation List: महानगरपालिकानिहाय आरक्षण १. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)२. नवी मुंबई: सर्वसाधारण३. वसई- विरार: सर्वसाधारण४. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती५. कोल्हापूर: ओबीसी६. नागपूर: सर्वसाधारण७. बृहन्मुंबई: सर्वसाधारण८. सोलापूर: सर्वसाधारण९. अमरावती: सर्वसाधारण (महिला)१०. अकोला: ओबीसी (महिला)११. नाशिक: सर्वसाधारण१२. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण१३. पुणे: सर्वसाधारण१४. उल्हासनगर: ओबीसी१५. ठाणे: अनुसूचित जाती१६. चंद्रपूर: ओबीसी (महिला)१७. परभणी: सर्वसाधारण१८. लातूर: अनुसूचित जाती (महिला )१९. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण२०. मालेगाव: सर्वसाधारण२१. पनवेल: ओबीसी२२. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण२३. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण२४. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण२५. जळगाव: ओबीसी (महिला)२६. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)२७. धुळे: सर्वसाधारण (महिला)२८. जालना: अनसूचित जाती (महिला)२९. इचलकरंजी: ओबीसी.मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेपमुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. ठाकरे सेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, मुंबईच्या महापौरपदाची लॉटरी जाणूनबुजून, ठरवून काढल्याचा आरोप केला आहे. याचा आम्ही आम्ही निषेध, धिक्कार करतो. मुंबईसाठी महिला ओबीसी चिठ्ठी घातलेली नाही. मुंबईचा महापौर महिला ओबीसी झालेली नाही. हा ओबीसींवर केलेला अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. .ठाकरे सेनेने घेतलेल्या आक्षेपाला वडेट्टीवारांचा पाठिंबादरम्यान, ठाकरे सेनेने महापौर आरक्षणावर घेतलेल्या आक्षेपाचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केले आहे. जर नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापौरपदाचा उमेदवार ठरलेला आहे. नागपूरमध्ये शिवानी दाणी ह्या भाजपच्या महापौर होतील, असेही वडेट्टीवारांनी सांगून टाकले. शिवसेनेला आरक्षणावर घेतलेला आक्षप सत्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.