Solapur News: जानेवारी महिन्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा हजार ७२३ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. किमान एक हजार व कमाल २३०० रुपयांचा सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला. २० दिवसांत कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना सात कोटी रुपये मिळाले. गतवर्षी दर तीन हजारांहून अधिक असल्याने एवढ्या कांद्यातूनच शेतकऱ्यांना १८ कोटी रुपये मिळाले होते. .अतिवृष्टी, महापूर या नैसर्गिक आपत्तीतून सावरलेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या दरातून आधार मिळेल, अशी आशा होती. पण, भाजीपाल्यांचे दर आता खूपच गडगडले आहेत. कांद्याला काही अपवाद वगळता खर्च देखील निघत नाही, अशीच बाजार समितीत स्थिती आहे. १ ते २० जानेवारीपर्यंत ११ दिवस बाजार समिती सुरू होती..Onion Market: कांदा बाजार राहणार गुरुवारपर्यंत बंद.यात सोलापूरसह शेजारील जिल्ह्यातून पावणेसात हजार गाड्या कांदा सोलापुरात आला होता. १ जानेवारी रोजी कांद्याला १२०० ते ३००० रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर मात्र कांद्याला २३०० ते २४०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. पण, किमान दर ९०० ते ११०० रुपयांचा दर मिळाला. .Onion Market Price: कांदा दर कमीच; तसेच काय आहेत सोयाबीन, गवार, आले आणि तुरीचे आजचे बाजारभाव? .अतिवृष्टी, महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवणे परवडत नसल्याने ते मिळेल त्या भावाने त्याची विक्री करीत आहेत. अजूनही कांद्याच्या दरात अपेक्षित सुधारणा झालेली नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..जानेवारीतील आवक अन् भावएकूण आवक : ६,७२३ ट्रकएकूण उलाढाल : ६.९७ कोटीसरासरी भाव : १००० ते २३०० रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.