Chhatrapati Sambhajinagar News: चालू आर्थिक वर्षात महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजग्राहकांनी डिजिटल पर्याय अवलंबून व तत्पर वीजबिल भरणा करून पावणेसहा कोटी रुपयांची सवलत मिळवली आहे..वीजग्राहकांनी बिलाच्या तारखेच्या सात दिवसांच्या आत ते भरल्यास एकूण रकमेच्या (कर व शुल्क वगळून) जवळपास १ टक्का तत्पर बिल भरणा सवलत, डिजिटल पद्धतीने (नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट/कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट/यूपीआय इ. वापरून) वीजबिल भरल्यास एकूण रकमेच्या (कर व शुल्क वगळून) ०.२५ टक्के डिजिटल भरणा सवलत व गो ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारून छापील बिलाऐवजी ई-मेलवर वीजबिल घेतल्यास दरमहा १० रुपये सवलत दिली जाते..Mahavitaran Consumer: वीजदरावरून ग्राहक मंचाचा ‘महावितरण’ला दणका.महावितरणने ग्राहकांसाठी सर्व सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या डिजिटल सेवांचा वापर वाढावा यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन दिले जात आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजग्राहकांनी चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर-२०२५ या कालावधीत तत्पर वीजबिल भरणा सवलत ४ कोटी २४ लाख ३६ हजार, डिजिटल बिल भरणा सवलत १ कोटी २१ लाख ८२ हजार व गो ग्रीन पर्याय निवडण्याची सवलत २८ लाख २ हजार अशी एकूण ५ कोटी ७४ लाख २० हजार रुपयांची सवलत मिळवली आहे..Electricity Bill: वीजबिल अधिकृत संकेतस्थळांवरूनच भरा.त्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ग्राहकांनी अनुक्रमे २ कोटी ६४ लाख ८ हजार, ७४ लाख ३६ हजार व १४ लाख २४ हजार अशी एकूण ३ कोटी ५२ लाख ६८ हजार सवलत मिळवली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील ग्राहकांनी अनुक्रमे १ कोटी १८ लाख १ हजार, ३४ लाख ४० हजार व ८ लाख ९३ हजार अशी एकूण १ कोटी ६१ लाख ३४ हजार रुपये सवलत मिळवली आहे,.तर जालना मंडलातील ग्राहकांनी अनुक्रमे ४२ लाख २७ हजार, १३ लाख ६ हजार व ४ लाख ८५ हजार सवलत मिळवली आहे. महावितरणने ग्राहकांना वीज बिल पाहणे व भरणे, तक्रार नोंदवणे, नवीन वीजजोडणी अर्ज, वीजभार व नाव बदलणे आदी सर्व सेवा महावितरण वेबसाईट, महावितरण ग्राहक मोबाईल ॲपद्वारे डिजिटल माध्यमातून सुरक्षित, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या वेळ, श्रम व पैशांची बचत झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.