Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : परभणीतील मध्यम प्रकल्पांत सरासरी ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Water Level : तापमानात होत असलेली वाढ, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग तसेच बेसुमार उपसा सुरू असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठ्यात दिवसागणिक घट होत आहे.

Team Agrowon

Parbhani News : तापमानात होत असलेली वाढ, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग तसेच बेसुमार उपसा सुरू असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठ्यात दिवसागणिक घट होत आहे.

गुरुवारी (ता. १५) जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पाच्या जलाशयात १४ टक्के (४.३६९ दलघमी) व गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पात केवळ २ टक्के (०.५७ दलघमी) पाणीसाठा शिल्लक होता. या दोन मध्यम प्रकल्पांत सरासरी ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

जिल्ह्यातील ४ लघू तलाव कोरडे पडले असून, ९ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून, उर्वरित ९ लघू तलावात सरासरी ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. पाणीसाठा संपत चालल्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या लोकवस्त्यांवरील पाणीटंचाईचे संकट येत्या काळात गडद होणार आहे.

२०२३ मध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या अल्प पावसामुळे या दोन प्रकल्पांत मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी पाणीसाठा होता. नोव्हेंबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे अनेक तलावांतील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. उपसादेखील काही दिवस बंद राहिला. तापमानात घट झाली.

बाष्पीभवनाचा वेग कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा गेल्या काही दिवसांत फारशी घट कमी झाली होती. त्यामुळे यंदा कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु जलाशयातून अनधिकृतरीत्या उपसा सुरू आहे. चार लघू प्रकल्प कोरडे...

जिल्ह्यातील २२ पैकी लघू ९ प्रकल्पांमध्ये सरासरी ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. चार लघू तलाव कोरडे पडले आहेत, तर ९ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उपयुक्त पाणीसाठा असलेल्या लघू तलावात पेडगाव (ता. परभणी) येथील तलावात ३ टक्के, आडगाव (ता. जिंतूर) येथील तलावात ११ टक्के, पाडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. आंबेगाव (ता. मानवत) येथील तलावात १ टक्का,

झरी (ता. पाथरी) येथील तलावात ६६ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील तलावात १० टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील तलावात ४५ टक्के, टाकळगाव (ता. गंगाखेड) येथील तलावात ७ टक्के, तांदूळवाडी (ता. पालम) येथील तलावात ३४ टक्के पाणीसाठा होता. कोरडे पडलेल्या तलावात देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चारठाणा हे चार लघू तलाव आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT