Water Storage : निम्न दुधना प्रकल्पात १३.९१ टक्के पाणीसाठा

Water Scarcity : निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयात ३३.६९ दलघमी म्हणजेच १३.९१ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला होता.
Water Project
Water ProjectAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : तापमानात झालेली वाढ, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. तसेच जलाशयातून बेसुमार उपसा सुरू असल्यामुळे ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात दिवसागणिक घट होत आहे.

गेल्या २० दिवसांत जिवंत पाणीसाठ्यात ७.३६ दलघमीने घट झाली आहे. गुरुवारी (ता. १५) सकाळी निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयात ३३.६९ दलघमी म्हणजेच १३.९१ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला होता. उपयुक्त पाणीसाठ्यात घट सुरू असल्याने येत्या काळात पाणी टंचाईचे संकट अधिक गहिरे होऊ शकते.

Water Project
Water Storage : नांदेडमधील पाणीसाठा ५२ टक्क्यांपर्यंत खालावला

गतवर्षीच्या (२०२३) पावसाळ्यात धरणक्षेत्रातील अल्प पर्जन्यमानामुळे निम्न दुधना प्रकल्पाचे धरण भरले नाही. त्यात बाष्पीभवन, उपसा आदी कारणांमुळे या धरणातील पाणीसाठ्यात दिवसागणिक घट होत आहे. निम्म दुधना धरणाचा प्रकल्पीय जिवंत साठा २४२.२०० द.ल.घ.मी आहे.

यंदाच्या १ जून रोजी या धरणामध्ये ७७.४३१ दलघमी (३१.९७ टक्के) जिवंत पाणीसाठा होता. त्या वेळी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे उन्हाळी आवर्तने सुरू होती. डाव्या कालव्याद्वारे १.५९६ दलमघी उजव्या कालव्याद्वारे २.२३९ दलघमी पाणी सोडण्यात आले. ता. ९ जून रोजी आवर्तने बंद करण्यात आल्यानंतर धरणात २९.४५ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर पाणीसाठ्यातील घट सुरुच राहिली.

Water Project
Ujani Water Stock : उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव

१५ जुलै रोजी २५.५० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणक्षेत्रातील पावसामुळे १९ जुलैला वाढ होऊन ६५.५७७ दलघमी म्हणजेच २७.० टक्के जमा झाला. त्यानंतर पावसाचा खंड पडल्यामुळे ता. ३ ऑगस्टपासून धरणातील पाणीसाठ्यात घट सुरु झाली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे या धरणातील पाणीसाठ्यात २८.५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे फारसी वाढ झाली नाही. धरण क्षेत्रात १ जूनपासून एकूण ५९० मिलिमीटर पाऊस झाला. त्याआधीच्या वर्षी ७८५ मिलिमीटर पाऊस झाला होता. २०२३ च्या १ जूनपासून एकूण २४.९०७ दलमघी पाण्याचा येवा झाला.

या धरणात यंदाच्या ता. १५ जानेवारीला सकाळी ६ वाजता ४१.०५ दलघमी म्हणजेच १६.९५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षी (२०२३) ता. १५ फेब्रुवारीला १३३.७७ दलघमी म्हणजेच ५५.२३ टक्के जिवंत पाणीसाठा होता. बाष्पीभवन व इतर मिळून प्रतिदिन ५.४२ एमएमक्यूब व्यय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com