Sugarcane Crop agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crop : यंत्राने ऊस तोडणी कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या मुळावर; टनाला ४.५ टक्के वजावटीचा तोटा

Sugarcane Season : २०२१ च्या हंगामात याबाबत राज्यपातळीवर कायदा झाला, मात्र तीन वर्षांनंतर अभ्यास करून यामध्ये बदल करणे अपेक्षित असताना कोणताही बदल झालेला नाही, याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Season : कोल्हापूर विभागात विधानसभा निवडणुकीमुळे हंगाम संथ गतीने सुरू झाला आहे. दरम्यान कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी सुमारे २ हजार ५०० तोडणी मशीन यंत्रे कार्यरत असतात. मागच्या काही वर्षात यांत्रिकीकरणामुळे हंगामाला गती येत असली तरी यांत्रिकीकरणातून ऊस तोडणी वजावट ४.५ टक्के प्रतिटन केली जाते. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता १ कोटी टन ऊस या यंत्राने तोडला जात असतो. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे १४४ कोटींचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे.

२०२१ च्या हंगामात याबाबत राज्यपातळीवर कायदा झाला, मात्र तीन वर्षांनंतर अभ्यास करून यामध्ये बदल करणे अपेक्षित असताना कोणताही बदल झालेला नाही, याबाबत कार्यवाही व्हावी. अशी मागणी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांमधून होत आहे.

आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे म्हणाले की, कारखाने शेतकऱ्यांच्या वजनातून ४.५ टक्के वजन कपात करतात हेच मुळात बेकायदेशीर आहे. कारण उसातून जादा पाला आला, तर सरासरी रिकव्हरी कमी होऊन शेतकऱ्यांची एफ.आर.पी कमी होईल. यात कारखान्याचे कसलेच नुकसान होत नाही. उलट मशीनने ऊस तुटल्यावर वजनात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. कारखाने कपात करून शेतकऱ्यांची दुहेरी रक्कम घेतात. शेतकऱ्यांच्या वजनातून मशीन तोड वजावट रद्द करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितलं.

साखर उद्योगात ऊस तोडणीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. यामुळे ऊस तोडणी आता यांत्रिकीकरणाच्या दिशेने जात आहे. यंत्राद्वारे वेगाने तोडणी होते. तोडणी व गाळप यातील कालावधी कमी होतो. त्यामुळे साखर उत्पादनात वाढ होत आहे. जिल्ह्यात स्थानिक ऊस मजूर सुमारे ५० हजार आणि बाहेरच्या जिल्ह्यातून, राज्यातून येणारे सुमारे ८० हजार मजूर आहेत.

मशीनची तोडणी शेतकऱ्यांच्या मुळावर

मशीनने उसतोड करण्यासाठी ४.५ टक्के वजावट वजनात केली जाते. म्हणजे १०० टन ऊस गेल्यास साडेचार टनाचे पैसे कारखाना कापून घेत आहे. मशीनला टनाला ५० रुपये तोडणीसाठी जादा घेतले जातात. उसाचे जास्त कंडके पडल्यामुळे रस जाऊन वजनात घट येते. यातच साडेचार टक्के वजनात कपात केली जाते. तसेच शेतात मशीन, ट्रॅक्टर फिरल्यामुळे मशागतीला जादा खर्च येतो, असे नुकसान शेतकऱ्यांचे होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला वेग

Agriculture Department: तंत्र अधिकारी संवर्गात ठेवणे अन्यायकारक ठरेल

Talathi Bribery Case: लाचखोर तलाठ्याला सात वर्षांची सक्तमजुरी

Fruit Farming Workshop: सीताफळाचे भवितव्य ठरविण्यासाठी पुण्यात कार्यशाळा

SCROLL FOR NEXT