Indigenous Cattle Mathura Labhan Agrowon
ॲग्रो विशेष

Mathura Labhan Breed: शेती-ओढकामासाठी मथुरा लभान गोवंश

Indigenous Cattle Maharashtra: मथुरा भागात गाईवरून मीठ, भांडी आणि इतर प्रकारचा व्यापार होत होता. त्यानंतरच्या काळात हे गोपालक मराठवाड्याच्या किनवट, भोकर, यवतमाळ आदिलाबाद व लगतच्या भागात स्थलांतरित झाले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: मथुरा भागात गाईवरून मीठ, भांडी आणि इतर प्रकारचा व्यापार होत होता. त्यानंतरच्या काळात हे गोपालक मराठवाड्याच्या किनवट, भोकर, यवतमाळ आदिलाबाद व लगतच्या भागात स्थलांतरित झाले. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाचा शुद्ध देशी गोवंश असून, त्याला ‘मथुरा लभान’ अशी ओळख देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून (माफसू) होत आहे.

मराठवाडा भागात लाल कंधारी हा स्थानिक देशी गोवंश आहे. मात्र कृत्रिम रेतनाद्वारे त्यांची शुद्धता जपली गेली नाही. मथुरा लभान या गोवंशात कृत्रिम रेतन करण्यात आले नाही. काही प्रयोगशील पशुपालकांनी या गोवंशात अनुवांशिक शुद्धता राखण्यात यश मिळविले आहे. पशुपालकांकडे मथुरा लभान या गोवंशाचे जातिवंत पैदासक्षम वळू आहेत.

याच्या संगोपनासाठी चराईचा पॅटर्न राबविला जातो. सूर्योदयापूर्वी रानात चराईसाठी नेले जाते आणि सूर्यास्तापूर्वी परत आणले जाते. ५०० ते १५०० अशा संख्येच्या कळपातच हा गोवंश जंगलात जातो. या पशुपालकांकडे शेती नाही. परिणामी, चारा आणि पाणीटंचाई भासत असल्यास हे पशुपालक इतर भागात स्थलांतरित होतात. सद्यःस्थितीत सुमारे ४० हजारांवर हा गोवंश शिल्लक आहे.

वैशिष्ट्ये : गोवंश बहुतांश पांढऱ्या रंगाचा असतो. शिंगे वळणदार, त्वचा चमकदार, छातीची पोळ मध्यम आकाराची, शेपटी सरळ लांब असते, प्रति दिन दीड-दोन लि.दूध देतात.

यवतमाळ उमरखेड, किनवट, आदिलाबाद येथील परिसरात मथुरा लभान हा गोवंश दिसतो. शेती आणि ओढकामासाठी बैलांचा वापर होतो. हा काटक गोवंश आहे. ‘माफसू’कडून या देशी गोवंशाला ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
डॉ. पंडित नांदेडकर, पशु अनुवंश व पैदास विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी
कुलगुरू डॉ. नितीन पाटील, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील अवर्णीत जनावरांची नोंद घेणे सुरू आहे. त्यानुसार ‘माफसू’कडून मथुरा लभान गोवंशाला ओळख मिळवून देण्यासाठी डॉ. पंडित नांदेडकर यांच्या नेतृत्वात सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले आहे.
डॉ. अनिल भिकाने, विस्तार संचालक, माफसू, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin : ‘लाडकी बहीण’मुळे वित्तीय तूट नाही

Onion Rate Crash : कांद्याचे ट्रॅक्टर थेट कार्यालयासमोर आणून निषेध

Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

SCROLL FOR NEXT