Indigeneous Cattle: उंबर्डा, खामगावी गोवंशाला ‘माफसू’ देणार ओळख

Cattle Registration: देशाच्या विविध भागांत आढळणाऱ्या अवर्णीत जनावरांना त्यांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन ब्यूरो (कर्नाल, हरियाना) यांनी या नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे.
Indian Livestock
Indian LivestockAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: देशाच्या विविध भागांत आढळणाऱ्या अवर्णीत जनावरांना त्यांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन ब्यूरो (कर्नाल, हरियाना) यांनी या नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत विदर्भातील उंबर्डा आणि खामगावी या दोन गोवंशाचा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे ‘माफसू’च्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील आणि विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनानुसार विदर्भासह राज्यातील अवर्णीत जनावरांना ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अकोला येथील पदव्युत्तर पशुवैद्यक महाविद्यालयातील डॉ. शैलेंद्र कुरळकर यांच्या सनियंत्रणात अवर्णीत जनावरांची वैशिष्ट्ये संकलित केली जात आहेत.

Indian Livestock
Indigenous Desi Cow: देशी गोवंशपासूनच्या उत्पादनांसाठी‘ट्रेड मार्क’ येणार: डॉ. कोळेकर

उंबर्डा गोवंशाविषयी माहिती डॉ. कुरळकर यांनी सांगितले, की दारव्हा, दिग्रस, आर्णी (जि. यवतमाळ), मंगरूळपीर, मानोरा, कारंजा (जि. वाशीम), नांदगाव खंडेश्‍वर, पापळ (जि. अमरावती) या तालुक्‍यांत हा गोवंश आढळतो. बैल काटक असल्याने शेतीकामासाठी उपयुक्त आहेत. जनावराच्या कपाळाच्या मधात खाच दिसते. गाईचे दूध कमी आहे. १९११ च्या अमरावती जिल्हा गॅझेटमध्ये या गोवंशाचा उल्लेख आहे.

१९२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंकटेश केतकर यांच्या मराठी शब्दकोशात देखील याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या उंबर्डा गोवंशाची संख्या सुमारे दोन लाखांवर असून कारंजा तालुक्‍यातील उंबर्डा बाजारात यांची प्रामुख्याने विक्री होते, त्यामुळे या गोवंशाला उंबर्डा अशी ओळख मिळाली आहे.

Indian Livestock
Indigenous Cow: सेंद्रिय, नैसर्गिक शेतीला देशी गोवंशाची साथ

उंबर्डा गोवंशासोबत सोबतच खामगावी गोवंशाचे संगोपन होत आहे. या बाबत डॉ. कुरळकर म्हणाले, की १९१० च्या बुलडाणा जिल्ह्याच्या ब्रिटिश गॅझेटमध्ये या गोवंशाचा उल्लेख आहे. बुलडाणा, संग्रामपूर या भागात आढळणारा हा गोवंश कबऱ्या रंगाचा आहे. खूर, शिंगे, शेपटीचा गोंडा, चॉकलेटी रंगाचा आहे.

अंगावर लाल रंगावर पांढरे आणि पांढऱ्या रंगावर लाल ठिपके आहेत. बहाळा, सोनारी या नावाने देखील हा गोवंश ओळखला जातो. या गोवंशाचे बैल काळ्या शेत जमिनीत चांगल्या प्रकारे काम करतात. बैल अत्यंत काटक असून कोणत्याही हंगामात सरासरी सहा ते सात शेती काम करू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com