Warhadi Cattle: शेतीकामासाठी उपयुक्त : वऱ्हाडी गोवंश

Cattle Breed: महाराष्ट्रात नोंदणीकृत पशुधनाच्या जातींव्यतिरिक्त मोठ्या संख्येने उपलब्ध आणि वंचित असलेले स्थानिक देशी पशुधन अवर्णीत किंवा गावठी म्हणून ओळखले जाते.
Warhadi Cattle
Warhadi CattleAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रवीण बनकर

Indian Livestock: महाराष्ट्रात नोंदणीकृत पशुधनाच्या जातींव्यतिरिक्त मोठ्या संख्येने उपलब्ध आणि वंचित असलेले स्थानिक देशी पशुधन अवर्णीत किंवा गावठी म्हणून ओळखले जाते. मात्र असे पशुधन शास्त्रोक्त पातळीवर अभ्यासून, त्यांना नोंदणीकृत पशुधनाच्या कक्षेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने केंद्रीय संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ, पशुसंवर्धन विभाग आणि बिगरशासकीय संस्था यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील पशुधनाच्या देशी जातींचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पारंपरिक पद्धतीने शेती कसणारा समाज आजही उमद्या वऱ्हाडी बैलजोडीचा सांभाळ करताना दिसतो. कुटुंबाच्या गरजेपुरतेच दूध उत्पादन होते. बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला जातो. वऱ्हाडातील उष्ण तापमान, कोरडे हवामान आणि काळ्या जमिनीत चिवटपणे काम करण्याची क्षमता, चपळता वऱ्हाडी गोवंशामध्ये आहे. त्यामुळे स्थानिक पशुपालकांमध्ये वऱ्हाडी गोवंशाला विशेष पसंती आहे.

Warhadi Cattle
Indigeneous Cattle: उंबर्डा, खामगावी गोवंशाला ‘माफसू’ देणार ओळख

पशुपालक घराजवळील पारंपरिक गोठ्यात जनावरांना बांधून ठेवतात. उन्हाळा वगळता इतर ऋतूत लहान वासरे सोडून मोठी जनावरे चराईसाठी शेतशिवारात दिवसभर मोकळी सोडली जातात. दूध काढणी, चारा,पाणी यासारखी कामे कुटुंबातील पुरुषांकडून आणि नवजात वासराचे संगोपन, गोठ्याची स्वच्छता, शेण काढणे इत्यादी कामे महिला करतात. पोळा, वसुबारस सणाच्या दिवशी आपल्या वऱ्हाडी गोधनाचे पूजन मोठ्या उत्साहात पशुपालकांकडून केले जाते. वऱ्हाडी गोवंशाची शास्त्रोक्त निकषांवर नोंदणीकरण होण्यासाठी सद्यःस्थितीत, अकोला येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातर्फे वऱ्हाडी गोवंशाचे सर्व्हेक्षण आणि अभ्यास सुरू आहे.

Warhadi Cattle
Maharashtra Cattle Breeds: पावसाळी प्रदेश, भातशेतीसाठी डांगी गोवंश

गोवंशाची वैशिष्ट्ये

अकोला जिल्ह्याच्या ब्रिटिश गॅझेटमध्ये वऱ्हाडी गोवंशाचा उल्लेख आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी इंग्रज काळात नाशिक आणि पुणे जिल्ह्यात वऱ्हाडी किंवा बेरारी गोधनाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे नमूद आहे.

विदर्भातील गवळाऊ गोवंशापेक्षा शरीरयष्टीने बलवान असल्याने वऱ्हाडी बैलांची विक्री वर्धा जिल्ह्यात होत असल्याचे ब्रिटिशकालीन दस्तऐवजावरून दिसून येते. आजमितीला वऱ्हाडी गोवंश अकोला जिल्ह्यात तसेच लगतच्या वाशीम, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील देशी, गावरान, गावठी म्हणून सुपरिचित आहे.

पांढरा आणि क्वचित फिकट लाल रंगाचा आहे. इतर नजीकच्या गोवंशापेक्षा अंगकाठीने उंचेपुरे, बदामी डोळे, सरळ उतरते कपाळ, नाकपुड्यांकडे निमुळते होणारी चेहऱ्याची ठेवण, मध्यम आकाराची वर जाणारी शिंगे, रुबाबदार वशिंड, किंचित लोंबती मानेची पोळी, पाठीचा कणा सरळ असतो.

वळूमध्ये वशिंड, मानेची पोळी आणि खांद्याकडील भाग काळसर दिसून येतो. नाकपुड्यांचा रंग काळा कुळकुळीत असतो. डोळे, पापण्या, शिंगे, खुरे राखाडी काळ्या रंगाची असतात. शेपटीचा गोंडा काळ्या केसांसह पांढरी, लाल मिश्र केसांचा असतो.

गोधनाची शारीरिक उंची सरासरी ३.५ ते ५ फुटांपर्यंत आणि शारीरिक लांबी ३ ते ४.५ फूट दिसून येते. वयस्क जनावराचे वजन सरासरी २५० ते ३०० किलोपर्यंत असते.

कासेचा आकार कटोऱ्यासारखा असतो. काळ्या रंगाच्या सडांचा आकार निमुळता बोटांसारखा असतो.

- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९

(पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग,स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com