Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा सुमारे एक लाख ९ हजार २७८ हेक्टरवर उन्हाळी पेरणी झाली त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तसेच लातूर व नांदेड या पाच जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन उन्हाळी पेरणी करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
पावसाळ्यात उपलब्ध झालेला पाणीसाठा लक्षात घेता यंदा रब्बी व उन्हाळी क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यातील सर्व साधारण ३२ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४४ हजार ५२२ हेक्टरवर उन्हाळी पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १३६ टक्के इतकी आहे.
दुसरीकडे लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातील सर्वसाधारण ७१ हजार ७०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६४ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी झाली आहे. जी सर्व साधारण क्षेत्राच्या तुलनेत सरासरी ९० टक्के इतकी आहे. सर्वात कमी हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राचा तुलनेत केवळ ५३ टक्के तर सर्वाधिक पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात १८२ टक्के इतकी झाली आहे.
मका १८ हजार हेक्टरवर
छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात उन्हाळी मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ११३७३ आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात १८०८८ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे. जी सर्व साधारण क्षेत्राच्या तुलनेत १५९ टक्के इतकी आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक ११ हजार २२९ हेक्टर, जालनामधील ५५४१ हेक्टर तर बीडमधील १३१८ हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाच्या समावेश आहे.
तीन जिल्ह्यांत बाजरी १९ हजार हेक्टरवर
छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण ८७३ क्षेत्राच्या तुलनेत १९ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २२५ टक्के इतकी आहे. पेरणी झालेल्या बाजरी क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ६ हजार ९४३ हेक्टरवरील बाजरी क्षेत्रासह जालनामधील ४१४१ हेक्टर व बीडमधील २२५ हेक्टरवरील बाजरी पिकाच्या समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
लातूर कृषी विभागातील पीक स्थिती (स्रोत कृषी विभाग)
ज्वारी कणसे भरण्याच्या अवस्थेत
मका दाणे भरण्याच्या अवस्थेत
भुईमूग शेंगा भरण्याच्या अवस्थेत
तीळ बोंडे भरण्याच्या अवस्थेत
जिल्हानिहाय उन्हाळी पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)
जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी
छ.संभाजीनगर ३२६५८ ४४५२२ १३६
जालना १४९०३ २०६२६ १३८
बीड ७४५६ १२५७० १६७
लातूर २३९६ ४३६५ १८२
नांदेड २२४४१ ३२२४४ १४४
परभणी १०९५९ ७८५८ ७२
धाराशिव ९५५५ ६२८९ ६६
हिंगोली २६३४९ १३९८० ५३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.