Jalgaon News: खानदेशात दर पाडून केळीची खरेदी जोमात सुरू झाली आहे. बाजार समित्या दर जाहीर करीत आहेत. परंतु जाहीर दरात केळीची खरेदी होत आहे की नाही, शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे का, याची चौकशी, कारवाई मात्र बाजार समित्या करीत नसल्याची स्थिती खानदेशात आहे. केळीची कमी दरात खरेदी यंदा मागील अनेक महिने सुरू आहे. शेतकरी अडचणीत आले आहेत. वारंवार या बाबत तक्रारी करण्यात आल्या. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे..जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा व जळगाव या बाजार समित्या केळीचे दर जाहीर करतात. या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात केळी पीक अधिक आहे. तसेच या बाजार समित्या केळी खरेदीसंबंधी परवाना वितरण, त्यांचे नूतनीकरण, विपणन, सेस वसुली ही कार्यवाही करतात. परंतु या बाजार समित्या फक्त सेस वसुली किंवा बाजार शुल्क वसुली करतात..Banana Farming: खानदेशात कांदेबाग केळी लागवडीत घट.केळीचे जे दर जाहीर होतात, त्या दरात केळीची खरेदी होत आहे की नाही, या बाबत चौकशी, तपासणी केली जात नाही. सध्या केळीचे दर ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल जाहीर केले जात आहेत. परंतु खरेदी या दरांपेक्षा कमी दरात सर्रास केली जात आहे. अनेक खरेदीदार केळीला फक्त ६०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलचा दर देत आहेत. तर काही खरेदीदार सरसकट ८५० रुपये प्रति क्विंटलचा दर देत आहेत..यात शेतकऱ्यांची सर्रास लूट होत आहे. परंतु या बाबत बाजार समित्या, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कुठलीही कारवाई दोषी खरेदीदारांवर केली जात नसल्याचे चित्र आहे. काही खरेदीदारांकडे खरेदीचे परवाने नाहीत. तर काही खरेदीदारांची कुठलीही अनामत रक्कम बाजार समित्यांकडे जमा झालेली नाही. अशात अनेकदा केळीची खरेदी केल्यानंतर खरेदीदार पैसे न देताच पळून जातात. त्यांची शोधाशोध करावी लागते. अशा वेळेस बाजार समिती तक्रारही घेत नाही. तसेच या बाबत चौकशी, कारवाईदेखील करीत नाही..Banana Market: केळीच्या आवकेत खानदेशात मोठी घट.अनेक खरेदीदार, एजंट मध्य प्रदेश व इतर भागातून येतात. त्यांची कुठलीही ओळख बाजार समित्यांकडे नसते. अशा स्थितीत बाजार समित्यांनी खरेदीदार, व्यापारी, एजंट यांच्याकडून अनामत रक्कम घ्यायला हवी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत..बाजार समित्यांचा डोळा फक्त करवसुलीवरजळगाव, यावल, चोपडा, रावेर आदी बाजार समित्यांनी बाहेरील किंवा थेट (शिवार, खेडा) खरेदीवरील सेस किंवा बाजार शुल्क वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. १६ टन केळीची खरेदी केलेली असल्यास ५०० रुपये शुल्क वसूल केले जाते. शुल्क वसुलीची काळजी बाजार समित्यांना आहे. परंतु खरेदी केलेल्या केळीसंबंधी संबंधित केळी उत्पादकास काय दर मिळाला, याची चौकशी, माहिती बाजार समिती घेत नाही. बाजार शुल्क खरेदीदाराकडून घेतले जाते, असे केळी उत्पादकांचे म्हणणे आहे..केळी लागवड देशात जळगाव जिल्ह्यात अधिक असते. पण केळीची खरेदी खानदेश, विदर्भ भागातून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीच्या दरानुसार केली जाते. हा प्रकार चुकीचा आहे. जे दर बाजार समित्या जाहीर करतात त्यानुसारच खरेदी व्हायला हवी.रवींद्र फालक, शेतकरी, डांभुर्णी, जि. जळगाव.केळीचे चार, पाच दर असतात. दर्जानुसार दोनच दर असावेत. तसेच केळीला किमान १४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव हवा. तसेच शासनाने पोषण आहारात केळी द्यावी.सौरव महाजन, शेतकरी, खेडी खुर्द, ता. जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.