Summer Sowing : उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल

Summer Crop : ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेण्याकडे कल वाढवला असून यंदा उन्हाळी ज्वारीच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
Summer Sowing
Summer Sowing Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेण्याकडे कल वाढवला असून यंदा उन्हाळी ज्वारीच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. अमरावती विभागात उन्हाळी हंगामात ज्वारीखाली ११ हजार ८८७ हेक्टर क्षेत्र आले आहे. या भागात ज्वारीखाली २ हजार ८९८ हेक्टर क्षेत्र असून यंदा पेरणीची सरासरी ४१० टक्क्यांवर गेली आहे.

ज्वारी बहुतांशी खरीप हंगामात घेण्यात येते. अलीकडे या हंगामातील ज्वारीच्या क्षेत्रात कमालीची घट होऊ लागली आहे. वातावरणातील बदल व पक्षांचा त्रास यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाचे क्षेत्र कमी केले आहे. आता मात्र ज्वारीला बाजारात वाढलेली मागणी व पशूंसाठी चाऱ्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामात ज्वारीच्या पेरणीकडे लक्ष दिले आहे.

यंदाच्या उन्हाळी हंगामात ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून आले आहे. अमरावती विभागात उन्हाळी हंगामातील ज्वारीचे लागवडीखालील सरासरी क्षेत्र २ हजार ८९८ हेक्टर आहे. मात्र विभागात ११ हजार ८८७ हेक्टर म्हणजे तब्बल ४१० टक्के क्षेत्रात ज्वारीची लागवड झाली आहे. उन्हाळी ज्वारीची पेरणी योग्य वेळी केल्यास उत्पादनात वाढ होते, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये डिसेंबरपासूनच पेरणी सुरू झाली होती.

Summer Sowing
Summer Sowing : साडेतीन लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी

काही ठिकाणी ज्वारीचे पीक कणसाच्या अवस्थेत आले आहे. अमरावती विभागात उन्हाळी पिकांखालील सरासरी क्षेत्र ४२ हजार ५८९ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ताज्या अहवालानुसार ६५ हजार ३८९ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या १५४ टक्क्यांइतकी पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.चारा पिकासाठी मका पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे, तर उन्हाळी बाजरी पीक घेण्याकडील शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे.

विभागातील एकूण अन्नधान्य पिकाखालील सरासरी क्षेत्र १५ हजार १३३ हेक्टर असून त्यापेक्षा अधिक म्हणजे २४ हजार ३९६ हेक्टरवर म्हणजे १६१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. उन्हाळी भुईमुगाचे सरासरी क्षेत्र २२ हजार ९८३ हेक्टर असून, २२ हजार ४०५ हेक्टर म्हणजे ९७ टक्के हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मुगाच्या ५ हजार ४३२ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ हजार २६ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे. उडदाची लागवड ६१६ हेक्टरवर झाली आहे.

Summer Sowing
Summer Soybean Sowing : उन्हाळ सोयाबीन खानदेशात कमी

उन्हाळी बाजरीचेही क्षेत्र वाढले

खरीप हंगामात पावसाळी स्थितीमुळे बाजरी पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याऐवजी उन्हाळी बाजरी पीक घेण्यावर भर दिल्याचे अलीकडील काही दिवसांत दिसून येत आहे. कारण, उन्हाळी हंगामात बाजरी पिकावर रोग, किडीचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो.

बाजरीचे सरासरी क्षेत्र १६५ हेक्टरइतके आहे. तर प्रत्यक्षात १ हजार ७९ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ६५४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात बाजरीची सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी होऊन उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. शिवाय बाजरीचा चांगल्या दर्जाचा चाराही उपलब्ध होतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सूर्यफुलाचे लागवड २ हजार ४३२ हेक्टर (३१९ टक्के), तीळ पिकाची लागवड १५ हजार ७९० हेक्टर (७३३ टक्के) क्षेत्रात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com