Forest Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department : वनविभाग करणार जंगलांतील आगप्रवण क्षेत्राचे नकाशे

Forest Fire : पश्‍चिम महाराष्ट्रात वनक्षेत्रातील आगीच्या घटनांचा वाढता धोका आणि अशा जंगलांना लागलेल्या आगींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभाग सरसावला आहे.

Team Agrowon

Pune News : पश्‍चिम महाराष्ट्रात वनक्षेत्रातील आगीच्या घटनांचा वाढता धोका आणि अशा जंगलांना लागलेल्या आगींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. या विभागाने जंगलांत आग लागण्याची शक्यता असलेल्या भागांचा नकाशा तयार करण्याची योजना आखली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वन विभागाने आपल्या दहा वर्षांच्या तपशीलवार प्रकल्प अहवालात लक्ष केंद्रित केलेल्या काही बाबींत या आगीच्या विषयाचा समावेश आहे. या बाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. दरवर्षी जंगलात आग लागण्याचे प्रकार वारंवार होत आहेत.

वन्यजीवांसाठी विशेषत पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना या आगीपासून मोठा धोका आहे. पुणे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात दरवर्षी आगीच्या असंख्य घटना घडतात. ‘डीपीआर’नुसार गेल्या वर्षभरात विभागामध्ये विविध ठिकाणी ६५ अशा प्रकारच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे २१२.५१ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे.

वनविभागाने काही अप्रत्यक्ष प्रतिबंधात्मक उपायदेखील प्रस्तावित केले आहेत. आगीच्या हंगामात मध गोळा करण्यास प्रतिबंध करणे प्रस्तावित आहे. त्याशिवाय कार्यशाळा, बैठका, पोस्टर्स, हॅडआउट्स, बोर्ड आणि लघुपटांसारख्या इतर माध्यमांद्वारे जनजागृती कार्यक्रम हाती घ्यावेत, असाही प्रस्ताव आहे.

जंगलातील आग शोधण्यासाठी फायर लाइन्स आणि वॉच टॉवर्सचे चांगले नेटवर्क स्थापित करणे, दळणवळण यंत्रणा बळकट करणे आणि सक्षमपणे गस्त घालणे हे देखील या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग आहे. सध्या हा प्रस्ताव नागपूर येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

‘मागील नोंदीवरून नकाशे’

‘‘पुणे विभागाने ‘डीपीआर’मध्ये जंगलातील आगीसाठी काही थेट प्रतिबंधात्माक उपाय सूचविले आहेत. या प्रस्तावातील प्रमुख बाबींमध्ये गेल्या पाच वर्षांचा आगीचा इतिहास आणि ज्वलनशील सामग्रीची उपलब्धता यावर आगप्रवण क्षेत्राचा अंदाज बांधण्यात आला आहे.

हा नकाशा मागील नोंदी आणि इतर घटकांच्या आधारे बनविण्यात येईल. तसेच संवेदनशील भागात विशेषत वन्यजीवाच्या अधिवासात आग रोखण्यासाठी लक्ष दिले जाईल,’’ अशी माहिती पुणे विभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT