Agro Tourism  Agrowon
ॲग्रो विशेष

Agro Tourism : कृषी पर्यटनात रोजगाराच्या अनेक संधी

कृषी पर्यटन म्हणजे कृषी आणि पर्यटन यांचा समन्वय आहे. स्वतः शेतकऱ्याने आपल्या खेड्यातील फळत्या-फुलत्या शेतावर आयोजित केलेली आनंददायी शिक्षण प्रक्रिया व मौज यांचा सुंदर मिलाफ असलेला हा उपक्रम होय.

Team Agrowon

Agro Tourism कृषी पर्यटन म्हणजे कृषी आणि पर्यटन यांचा समन्वय आहे. स्वतः शेतकऱ्याने आपल्या खेड्यातील फळत्या-फुलत्या शेतावर (Farm Tourism) आयोजित केलेली आनंददायी शिक्षण प्रक्रिया व मौज यांचा सुंदर मिलाफ असलेला हा उपक्रम होय.

थोडक्यात, कृषी पर्यटन म्हणजे आगळ्या वेगळ्या प्रकारच्या सहलीचा आनंद देणारा व्यवसाय होय.

पाऊस, पीक आणि शेतीमालास मिळणारे दर यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून असते. वातावरण, कामगार, मालाची किंमत इत्यादी समस्यांना शेतकऱ्यांना वारंवार तोंड द्यावे लागते.

शेतकऱ्यांनी आपला माल ग्राहकांपर्यंत नेण्यापेक्षा ग्राहकांना म्हणजे पर्यटकांनाच आपल्या शेती फार्मपर्यंत आणणे आवश्यक आहे.

त्यासाठी तुमच्याकडील उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून कमी भांडवलात, कमी गुंतवणुकीत तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे.

कृषी पर्यटन व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक नाही. कृषी पर्यटन विकास महामंडळ किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत नोंदणीकृत पर्यटन केंद्रांना ३० टक्के सरकारी अनुदान व सहकारी बँका आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून १० टक्के व्याजदराने ५० लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.

एक एकर जमिनीवर रस्ता, पाणी, लाइट या प्राथमिक सुविधा उपलब्ध असतील तर १५ लाख रुपये किमान भांडवलामध्ये कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करता येतो.

हा व्यवसाय करताना तुमचे कृषी पर्यटन केंद्र असेच असावे असा काही नियम नाही. त्यामुळे तुम्ही राहत असलेल्या भागातील वातावरण, तिथली पिके, संस्कृती, येणारा पर्यटक वर्ग यांचा विचार करून तुमच्या सर्जनशीलतेनुसार विशिष्ट थीम निवडून तुम्हाला हवे तसे तुम्ही तुमचे कृषी पर्यटन केंद्र बनवू शकता.

येणाऱ्या पर्यटकांना काहीतरी वेगळा, नवीन व आनंददायी अनुभव देता येईल, यासाठी आकर्षक फुले, वेली, कीटक, फुलपाखरे, मातीचे प्रकार पाहता येतील, हे कृषी पर्यटनात पाहावे. सेंद्रिय भाजीपाला, विविध मधूर फळे, औषधी वनस्पतींची लागवड करून माहिती देणे, शेतीच्या आजारांची व प्रमुख सणांची माहिती देणारे संग्राहलय तयार करणे,

गोधडी बनविणे, पेंटींग करणे, मातीची भांडी बनविणे म्हणजे चिखलात खेळणे, किल्ला बनविणे, लाकडी वस्तू तयार करणे, झाडावर चढणे, झोका खेळणे, शेतीच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे, शेतीला बैलगाडीतून किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून फेरफटका मारणे, पोहणे, बोटिंग करणे,

घोडे सवारी यांसह स्वतः सहभागी होऊन पर्यटकांना आनंद देणे आवश्यक आहे. पाळीव प्राण्यांची व विविध पिकांची माहिती देणे, ज्येष्ठांना फेरफटका मारण्यासाठी जॉगिंग पार्क व लॉन लावणे, लहान मुलांसाठी खेळणी बसविणे, हुर्डा पार्टीसाठी नियोजन करणे आदी विरंगुळा देणारे अनेक अनुभव वेगळी कुठलीही गुंतवणूक न करता पर्यटकांना देऊ शकतो.

कृषी पर्यटन केंद्रात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सुविधा असणे आवश्यक आहे. चुलीवरच्या गावरान जेवणाबरोबरच दही, ताक, चिंच, बोरे, आवळा, कैरी, मका कणीस, ऊसाचा ताजा रस, भुईमुगाच्या शेंगा, हरभरा यांचा आस्वाद पर्यटकांना आकर्षित करतो.

शेतीमाल, धान्य, फळे, सेंद्रिय भाजीपाला, कुरडया, पापड, लोणची, मसाले, मध, दूध, दही, तूप, गोमूत्र, अगरबत्ती, धूपकांडी, गोधडी, इत्यादींची विक्री कृषी पर्यटन केंद्रात करता येते.

बांबूचा किंवा कापडी तंबूचा वापर रात्रीच्या विश्रांतीसाठी उपलब्ध करून देता येईल. ऑफ सीझनमध्ये मुलांचे कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम व लग्नसमारंभ, वाढदिवस, सामाजिक व राजकीय मेळावे, महिला बचत गटांचे मेळावे, किटी पार्टी, हंगामी उत्सव, शैक्षणिक सहली यासाठी पण पर्यटन केंद्राचा वापर करता येतो.

आपण कृषी पर्यटन केंद्र चालू करणार म्हटल्यावर त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी, व्यवसायात वाढ होण्यासाठी विविध माध्यमांतून जाहीरात करणे महत्वाचे असते. पर्यटन केंद्राचे यश हे पर्यटकांच्या समाधानावर अवलंबून असते आणि पर्यटकांचे समाधान त्यांना मिळणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

कृषी पर्यटनाचे महत्त्व

- कृषी पर्यटन शेतीला पूरक व्यवसाय आहे.

- शेतकरी, महिला, नवयुवक यांना रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतात.

- कृषी उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळू शकते.

- ग्रामीण भागातील पडीक व गायरान जमिनीचा योग्य वापर होऊन उत्पन्नात भर पडेल.

- पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत मिळते.

- शेतकऱ्याला सामाजिक प्रतिष्ठेची वागणूक मिळू लागते.

- कृषी पर्यटन या जोड व्यवसायामुळे शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

अशा या शेतीस पूरक कृषी पर्यटन व्यवसायातून महिन्याला किमान चार ते पाच लाख रुपये इतके किमान एकरी उत्पन्न शेतकऱ्यास मिळू शकेल.

- शीतल गुगळे, भोसरी, पुणे (९९२२२२६९११)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT