Agro Tourism : नियोजन, कष्टांतून साकारलेले मुलूख कृषी पर्यटन केंद्र

मुळा-मुठा नदीच्या काठावरील दहिटणे (ता. दौंड, जि. पुणे) येथे पिलाणे कुटुंबाने शेतीचा विस्तार करताना मुलूख कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. बारा वर्षांआधीपासून फळबागा, झाडे लागवड, शेततळे उभारणी, सौंदर्यपूर्ण कलात्मक रचना व नियोजनाद्वारे सर्वसुविधा देणारे हे केंद्र विकसित केले. पुणे, मुंबईसह परदेशातील पर्यटकांनाही हे केंद्र चांगलेच खुणावू लागले आहे.
Agri Tourism
Agri TourismAgrowon
Published on
Updated on

पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यात मुळा-मुठा नदीच्या काठावर दहिटणे गाव आहे. हा भाग उसाचा पट्टा (Sugarcane Belt) म्हणून ओळखला जातो. गावातील बाळासाहेब पिलाणे पुण्यातील शासकीय तांत्रिक महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करायचे. नोकरीत असतानाचा गावी पर्यटन केंद्र (Agri Tourism Center) उभारण्याचे त्यांच्या डोक्यात होते. त्यांची १० एकर शेती आहे. जोडीला १५ एकर माळरान घेत बारा वर्षांपूर्वीच केंद्राची आखणी व विकास सुरू केला.

ओबडधोबड असलेली जमीन शेतीयोग्य केली. वृक्षांच्य वाढीला वेळ लागत असल्याने आधी त्यांच्या लागवडीवर भर दिला. कृषी विभागाच्या मदतीने एक कोटी लिटर शेततळ्याची उभारणी केली. नैसर्गिक जैवविविधता जपली. आज एक तपाहून अधिक काळ घेतलेल्या या कष्टांतून मुलूख कृषी पर्यटन केंद्र आकारास आले आहे. सन २०१८ पासून व्यावसायिक स्तरावर ते पर्यटकांसाठी खुले केले आहे. त्याची मुख्य जबाबदारी मुलगा कृषिराज वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सांभाळतात. बंधू सागर बांधकाम व्यवसाय पाहतात.

Agri Tourism
'बसवंत कृषी पर्यटन' महोत्सवांतर्गत कृषी पर्यटनावर होणार मंथन

पर्यटन केंद्राची वैशिष्ट्ये

-मुळा मुठाच्या रमणीय परिसरात साकारलेलं. शहराच्या धकाधकीपासून प्रदूषणमुक्त शांत वातावरण.

-ग्रामीण जीवन व निसर्गाचा समृद्ध अनुभव.

-विविध वृक्षांची लागवड. फणस १०, कवठ ५, जांभूळ ६, नारळ २००, आंबा ८०, चिंच ४०, डाळिंबाची नवी ८५० अशी झाडांची विविधता. फुलझाडे, औषधी वनस्पतींचीही लागवड. पक्ष्यांचा विहार व शेततळ्यांत बदके.

-वृंदावन विभागाची उभारणी. तेथे कृष्णाचे मंदिर.

-सेंद्रिय शेती, विविध पिकांची प्रात्यक्षिके. रोपवाटिका.

-टाकाऊपासून टिकाऊ वस्तू व खेळणी.

Agri Tourism
कृषी पर्यटन व्यवसायाने पैसाच नव्हे, समाधानही दिले

- कचऱ्यापासून खतनिर्मिती

- ‘रेनवॉटर हार्वेस्टिग’

-ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी पारंपरिक अवजारे, जात, उखळ, मुसळ, वरंवटा.

-बैलगाडीची शिवारफेरीची सफर, शेकोटीचा अनुभव

- पर्यटन स्थळावर असलेल्या विविध रानफुलांचा प्रत्यक्ष अनुभव.

-पर्यटकांच्या मागणीनुसार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळा, रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

- हिवाळ्यात हुरडा पार्टी तर उन्हाळ्यात आमरस पार्टी

-पर्यटकांना झाडावरून स्वतः आंबे काढण्याचा आनंद घेता येतो.

-दगड-धोंड्याच्या माळरानावर ऑक्सिजन पार्कची उभारणी. यात कडुनिंबाची ३०० ते ४००, बदाम १०, शिरीष ६, बांबू, बहावा, अर्जुन अशी विविध झाडे. त्यातून शुद्ध ऑक्सिजन उपलब्ध होण्यास मदत.

-जंगलातली भटकंती विलक्षण अनुभव देणारी असते. त्याचा आनंद देणारी व्यवस्था. देवराईचा पर्यायही उपलब्ध केला आहे.

-प्रशस्त पार्किंग, लॉन, मैदान, मुलांना खेळण्याच्या सुविधा.

जेवणाची व राहण्याची व्यवस्था

-घरगुती पद्धतीचे चुलीवरील भोजन. नाश्‍त्यासाठी घावण, थालीपीठ, मिसळ असा बेत.

-जेवणात पोळी, भाकरी, ठेचा, भरले वांगे, पिठलं, मटकी उसळ, रानभाज्या, अळू, कोंथिबीर वडी, कढी खिचडी, वरणभात आदी पदार्थ.

-निवासासाठी चार पक्क्या खोल्या. तीन तंबू. (टेन्ट).

-वीस ते २५ जणांची राहण्याची तर एक दिवसीय सहलीसाठी १०० व्यक्तींची सोय.

पर्यटकांचा प्रतिसाद

ओंकार म्हणाले, की प्रसिद्धीसाठी फेसबुक, वेबसाइट, इन्स्टाग्राम आदींचा आधार घेण्यात येतो. वर्षभराचा विचार केला तर महिन्याला २०० पासून ते ६०० पर्यंत व सरासरी ४०० पर्यंत पर्यटक भेटी देतात. दिवाळी ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वाधिक संख्या असते.

शाळांच्या सहली येथे येतात. साखरपुडा, वाढदिवस तसेच खासगी कंपन्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आदींचे आयोजन येथे होऊ शकते. कोरोना काळात व्यवसायावर परिणाम झाला होता. पण परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. आमचे नामदेव पिलाणे फाउंडेशन असून, कमी ‘बजेट’मध्ये विवाह करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची मदत करण्याचा उपक्रमही आम्ही राबविला आहे.

------------------

संपर्क

कृषिराज बाळासाहेब पिलाणे, ९३०९३३४३३८, ९९२१८४२९९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com