डॉ. संजय कोळसे, डॉ. अनिकेत चंदनशिवे, डॉ. सखाराम आघाव
Tomato Pest : राज्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्रातील हवामान टोमॅटो पिकासाठी अत्यंत पोषक आहे. बाजारात टोमॅटोला वर्षभर चांगली मागणी असते. लागवडीपासून फळ तोडणी आणि बाजारात माल पाठविण्यापर्यंत योग्य व्यवस्थापन केल्यास चांगला आर्थिक फायदा होतो. त्यासाठी दर्जेदार फळांचे उत्पादन मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जमीन,
हवामान, पाणी, खत, तसेच रोग व किडींचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या किडी
फुलकिडे, मावा, तुडतुडे
फुलकिडे आकाराने सूक्ष्म पिवळसर काळसर रंगाचे असतात.
दोन्ही किडी विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात.
पानांवर दिसून येतात.
प्रादुर्भावामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वळतात.
तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे झाड निस्तेज होऊन वाळते. तुडतुड्यांचा उद्रेक संकरीत जातींमध्ये अधिक दिसून येतो.
एकात्मिक व्यवस्थापन
क्रायसोपर्ला कार्निया या परोपजीवी कीटकांच्या १० ते १५ हजार अळ्या प्रति हेक्टर प्रमाणे सोडाव्यात.
रासायनिक नियंत्रण ः (प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)
सायअँन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओडी) १.८ मिलि किंवा
इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम किंवा
पांढरी माशी
माशी पानातील रसशोषण करते. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
जास्त प्रादुर्भावामध्ये फुलगळ होते. फळधारणा होत नाही.
लिफकर्ल या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते.
रासायनिक नियंत्रण ः (प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)
सायअँन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओडी) १.८ मिलि किंवा इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम किंवा
स्पायरोमेसीफेन (२२.९० टक्के एस.सी.) १.२५ मिलि
फळे पोखरणारी अळी
अळी प्रथम पाने खाऊन नंतर फळे पोखरते.
शेंड्याची किंवा रोपांचे पाने खातात.
लहान फळांना छिद्र पाडते. आतील गर खाऊन फळात विष्टा टाकते. त्यामुळे फळे खराब होऊन, सडतात. त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ होते.
व्यवस्थापन
पुनर्लागवड करते वेळी मुख्य पिकाच्या कडेने मका व चवळी लागवड करावी.
लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चीलोनिस हे मित्र कीटक १ लाख प्रति हेक्टरी या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा सोडावेत.
एकरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत.
रासायनिक नियंत्रण ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ टक्के) ०.३ मिलि किंवा
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९० टक्के सी.एस.) ०.६ मिलि किंवा
नोव्हॅल्युरॉन (१० टक्के ई.सी.) १.५ मिलि
नागअळी/ पाने खाणारी अळी
अळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडते.
पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा पडतात.
पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते.
नियंत्रण ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.८ मिलि किंवा नोव्हालुरॉन (५.२५ टक्के) अधिक इन्डोक्झाकार्ब (४.५० टक्के एस.सी.) १.६५ मिलि.
टोमॅटोवरील रोग
पर्णगुच्छ (लीफकर्ल)
पांढरी माशीमुळे रोगाचा प्रसार होतो.
पाने वाकडी, बारीक होऊन वरील बाजूस वळलेली दिसतात.
पानांचा रंग फिक्कट हिरवा पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते.
व्यवस्थापन
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी कीड नियंत्रणाता दिलेल्या रासायनिक उपायांचा अवलंब करावा.
रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी.
फळसड
लक्षणे
फळधारणेच्या अवस्थेमध्ये जास्त प्रादुर्भाव दिसतो.
फळांवर टोकाच्या बाजूस गोल तपकिरी रंगाचे डाग एकमेकांत वलये दिसतात.
फळे रंगहीन होऊन साल कातड्यासारखी होते. फळे सडतात.
व्यवस्थापन
क्रेसॉक्सिम मिथिल (१८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (५४ टक्के डब्ल्यू.पी.) संयुक्त बुरशीनाशक १.५ ग्रॅम
- डॉ. संजय कोळसे, (वनस्पती रोग शास्त्रज्ञ) ९८९०१६३०२१, - डॉ. सखाराम आघाव, (कीटकशास्त्रज्ञ)
९४२३००३३०७, (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.