Crop damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पीक नुकसानीचे पंचनामे करा

Heavy Rain Crop Damage : जिल्हयात २२ आणि २३ सप्टेंबरला जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र, मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस होऊनही महावेध वेबसाईटवर पर्जन्यनोंदीच्या आकडेवारीवरून संभ्रम निर्माण झाला.

Team Agrowon

Washim News : जिल्हयात २२ आणि २३ सप्टेंबरला जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र, मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस होऊनही महावेध वेबसाईटवर पर्जन्यनोंदीच्या आकडेवारीवरून संभ्रम निर्माण झाला. यावरुन शेतकरी, लोकप्रतिनिधींनी रोष व्यक्त केला.

या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी मालेगाव तालुक्यातील मेडशी, चांडस, जऊळका आणि किन्हीराजा या मंडलांमध्येही शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हयात २२ व २३ सप्टेंबरला वाशीम तालुक्यातील पाडी टकमोर व कोंडाळा या महसूल मंडलांमध्ये तसेच मालेगाव, शिरपूर, करंजी या महसूल मंडलांमध्येही २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला असून, अतिवृष्टीची नोंद झाली.

त्यामुळे या महसूल मंडलांमध्ये तसेच पूर परिस्थिती निर्माण झालेल्या महसूल मंडलातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे विहित कार्यपद्धतीनुसार पंचनामे करून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास तेवढ्या क्षेत्राकरीता विहित दराने अनुदान मागणी करण्याबाबत आदेश देण्यात आले.

मालेगाव तालुक्यातील मेडशी, चांडस, जऊळका, किन्हीराजा या महसूल मंडलांमध्येही अतिवृष्टीसदृश पाऊस झालेला आहे. परंतु महावेध वेबसाईटवरील पर्जन्यमानाच्या आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे शेतकरी व राजकीय प्रतिनिधींनी रोष व्यक्त केला.

त्यामुळे या महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी गृहीत धरून पंचनामे करावे किंवा कसे, याबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणी आदेश प्राप्त झालेले नाहीत.

सद्यःस्थितीत सोयाबिन कापणी/काढणीचा हंगाम सुरू आहे. संदर्भीय पत्रांबाबत आदेश प्राप्त होण्यास वेळ असल्याने पंचनामे वेळीच सुरू न केल्यास नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतो, पंचनाम्याच्या सर्वेमधून वगळल्या जाऊ शकतात.

त्यामुळे मालेगाव तालुक्यातील मेडशी, चांडस, जऊळका, किन्हीराजा या महसूल मंडलांमध्ये शेतीपिकांचे पंचनामे विहीत कार्यपद्धतीनुसार तातडीने करून त्याबाबत ३३ टक्के व त्यापेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांच्या क्षेत्राची, घरे व इतर नुकसानाची शासन निर्णयामधील दरानुसार निधी मागणी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत बुवनेश्वरी एस. यांनी आदेश काढले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT