PM Economic Advisory Counci Chairman S. Mahendra Dev Agrowon
ॲग्रो विशेष

US India Trade Deal: अमेरिकेसमवेत स्वतःच्या अटींवर करार करा

S. Mahendra Dev : ‘‘भारताने राष्ट्रीय हिताचा विचार करून, स्वतःच्या अटींवर अमेरिकेसमवेत व्यापार कराराच्या वाटाघाटी कराव्यात,’’ असे असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष एस. महेंद्र देव यांनी म्हटले आहे.

Team Agrowon

New Delhi News: ‘‘भारताने राष्ट्रीय हिताचा विचार करून, स्वतःच्या अटींवर अमेरिकेसमवेत व्यापार कराराच्या वाटाघाटी कराव्यात,’’ असे असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष एस. महेंद्र देव यांनी म्हटले आहे.

‘‘दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार साकारल्यानंतर इतर देशांपेक्षा भारताला आयात शुल्कामुळे फायदा होईल आणि यामुळे निर्यातीला चालना मिळेल,’’ असेही देव म्हणाले. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय हिताचा विचार करून स्वतःच्या अटींवर इतर देशांशी व्यापार करार वाटाघाटी करणे, असा भारताचा दृष्टिकोन असला पाहिजे. भारत-अमेरिकेमध्ये वाटाघाटी सुरू आहेत आणि अंतिम निर्णय दोन्ही देशांच्या परस्पर हितावर अवलंबून असेल.’’

दरम्यान, भारतासमवेत प्रस्तावित व्यापार करार अमेरिकेने इंडोनेशियाबरोबर मंगळवारी मंजूर केलेल्या कराराच्या धर्तीवर होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (ता. १६) म्हटले होते.

या करारात इंडोनेशियाने अमेरिकन उत्पादनांसाठी आपले बाजार पूर्णपणे खुले केले, तर अमेरिकेने इंडोनेशियातील वस्तूंवर १९ टक्के शुल्क लादले. इंडोनेशियाने अमेरिकेकडून १५ अब्ज डॉलरची ऊर्जा उपकरणे, ४.५ अब्ज डॉलर शेती उत्पादने आणि ५० बोइंग विमाने घेण्याचेही आश्वासन दिले आहे.

भारत-ब्रिटन करार पुढील आठवड्यात

भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करारावर पुढील आठवड्यात स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला या करारामुळे चालना मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.

६ मे रोजी करार होण्याच्या निश्चितीवर शिक्कामोर्तब झाले होते. भारत-ब्रिटन व्यापार करारामुळे चामड्याची उत्पादने, पादत्राणे आणि कपडे यांसारख्या उत्पादनांवरील निर्यात शुल्क रद्द होतील. तसेच, ब्रिटनमधील व्हिस्की आणि कार यांच्या आयातीवरील शुल्कात घट होऊन ते स्वस्त होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Australian Agriculture: विस्तारणारी ऑस्ट्रेलियातील बाजारपेठ

Crop Damage Surveys: पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण सुरु, ३ लाख २७ हजार लाभार्थी शेतकरी

Grape Disease Management: द्राक्ष बागेच्या फळछाटणीनंतर रोगांचे नियंत्रण कसे करावे?

Baripada Village Development: लोकसहभागातून ‘बारीपाडा’ स्वयंपूर्ण

SCROLL FOR NEXT