Ceasefire Claims : डोनाल्ड ट्रम्प तेरा वेळा बोलले, मोदी अजूनही मौन का? : काँग्रेस

Congress Vs Modi: भारत पाकिस्तानच्या संघर्षविरामासाठी मध्यस्थी केल्याच्या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदींवर हल्ला केला आहे.
Ceasefire Claims
Ceasefire ClaimsAgrowon
Published on
Updated on

New Delhi: भारत पाकिस्तानच्या संघर्षविरामासाठी मध्यस्थी केल्याच्या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदींवर हल्ला केला आहे.

भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष थांबविल्याचा दावा ट्रम्प यांनी ३४ दिवसांत १३ वेळा केला असताना पंतप्रधान मोदी यावर कधी बोलणार, असा सवाल काँग्रेसने केला. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.

Ceasefire Claims
Qatar Government: ट्रम्प यांना विमान देण्याबाबत अंतिम निर्णय नाही : कतार

जयराम रमेश यांनी म्हटले, की ट्रम्प आज ७९ वर्षाचे झाले. १० मे ते १३ जून या कालावधीत ३४ दिवसांमध्ये त्यांनी तीन वेगवेगळ्या देशांमध्ये, १३ वेगवेगळ्यावेळी जाहीरपणे डांगोरा पिटला, की अमेरिकेशी होणाऱ्या व्यापाराच्या मुद्द्याचा वापर करून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविराम घडवून आणला.

त्यांनी दोन्हीही देशांना एकसमानपद्धतीने लेखले. यानंतर आता पंतप्रधान मोदी, तुम्ही कधी बोलणार? पहलगाममध्ये २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com