Election Winner Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : सोलापुरात बहुतांश ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता

Gram panchayat Election Update : सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, बहुतांश ग्रामपंचायतीत महायुतीने सत्ता मिळवत, महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, बहुतांश ग्रामपंचायतीत परिवर्तन झाले आहे. तसेच जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीत महायुतीने सत्ता मिळवत, महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीचा निकाल हाती, भाजप समर्थक आघाडीचे संपूर्ण पॅनल विजयी झाले. येथे सरपंच अंबिका दशरथ कोळी विजयी झाल्या. करमाळा तालुक्यातील गोंडारे, रामवाडी या दोन ठिकाणी आमदार संजय शिंदे गटाचे सरपंच विजयी झाले.

भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींना मोठा धक्का मिळाला असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी ग्रामपंचायतीत काँग्रेस पॅनल विजयी, ७-२ ने काँग्रेसच्या बाजूनं निकाल लागला. येथे महेश पाटील विजयी झाले.

ठाकरे गटानं उघडलं खातं उघडत अक्कलकोट तालुक्यातील केगांव बुद्रुकची सत्ता मिळवली. येथे श्रीशैल आहेरवाडी विजयी झाले. करमाळा तालुक्यात वीट ग्रामपंचायतीत सुरज गणगे (राष्ट्रवादी : अजित पवार गट) विजयी झाले.

करमाळा तालुक्यातील केत्तूर ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीची सत्ता आली. येथे सचिन वेळेकर (स्थानिक आघाडी) विजयी झाले. कोर्टी येथे भाग्यश्री सुदाम नाळे विजयी झाले. संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली. येथे भाजपचे यशपाल वाडकर सरपंचपदी विराजमान झाले. टेंभूर्णीमध्ये बोबडे गटाने सत्ता मिळवली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT