Gram Panchayat Election : सातारा जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

Gram Panchayat Election Result : जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (ता.६) त्या-त्या तालुक्यात मतमोजणी पार पडली. काही तालुक्याचे अपवाद वगळता त्या-त्या तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी आपापल्या तालुक्यात सत्ता कायम ठेवली.
Grampanchayat Election
Grampanchayat ElectionAgrowon

Satara News : जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (ता.६) त्या-त्या तालुक्यात मतमोजणी पार पडली. काही तालुक्याचे अपवाद वगळता त्या-त्या तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी आपापल्या तालुक्यात सत्ता कायम ठेवली.

जिल्ह्यातील १३१ ग्रामपंचायतींपैकी ६८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर सरपंचपदाचे ३७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ६४ ग्रामपंचायतींसाठी तर सरपंचपदाच्या १४ जागांसाठी मतदान झाले होते. पाटण तालुक्यातील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने अनेक ठिकाणी वर्चस्व राखले आहे.

Grampanchayat Election
Chana Farming : हरभरा बीजोत्पादनात देशमुखांचे नाव खात्रीचे

पाटण तालुक्यातील १८ ग्रामपंचायती देसाई गटाकडे, तर चार ग्रामपंचायती पाटणकर गटाकडे, काँग्रेसकडे एक आणि एक अपक्ष असे बलाबल आहे. कऱ्हाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आठ, काँग्रेस तीन, तर एक ठिकाणी भाजप विजयी झाले आहे.

वाई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी आमदार मकरंद पाटील यांच्या नऊ ठिकाणी विजयी, तर सर्वपक्षीय दोन ठिकाणी विजयी झाले आहेत. माण तालुक्यात चार ग्रामपंचायतीपैकी एक बिनविरोध, तर एक राष्ट्रवादी, एक भाजप व एक ठिकाणी भाजप-शिवसेना विजयी झाले आहे.

Grampanchayat Election
Poultry Farming : गावरान कोंबडीपालन ठरले अल्पशेतीला फायदेशीर

सातारा तालुक्यात दोन ग्रामपंचायतींमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचा विजय झाला आहे. कोरेगाव तालुक्यात ५ ग्रामपंचातींपैकी तीन आमदार महेश शिंदे व दोन शशिकांत शिंदे समर्थक विजयी झाले आहेत. जावळी तालुक्यातील पाचपैकी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.

फलटण तालुक्यात विधान परिषद सभापची गटाच्या दोन खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर गटाचा दोन ग्रामपंचयतींवर विजय मिळवला आहे. खटाव तालुक्यात तीनही आमदार महेश शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com