Cotton Production Decline : मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात १७५.६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांत गेल्या हंगामात १९०.६७ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या तिन्ही राज्यांमध्ये उत्पादनात घट होणार आहे. मात्र खराब हवामानामुळे तिन्ही राज्यात कापशीच्या पिकावर परिणाम झाला आहे.
कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) ने १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या खरेदी हंगाम २०२३-२४ साठी कापूस उत्पादनाचा अंदाज २९४.१० लाख गाठींवर कमी केला आहे. विशेष म्हणजे हा अंदाज मागील हंगामातील २९५.१० लाख गाठी आणि ३११.६३ लाख गाठींच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे.
CAI ने ३११ लाख गाठींचा वापराचा अंदाज कायम ठेवला आहे. तसेच, निर्यात अंदाज १४ लाख गाठी (गेल्या हंगामातील १६.२७ लाख गाठी) आणि आयात अंदाज २२ लाख गाठी (गेल्या हंगामातील १२.५ लाख गाठी) ठेवण्यात आला आहे. मात्र, गेल्या हंगामातही ३११ लाख गाठींचा वापर झाला होता. CAI ने एका निवेदनात म्हटले आहे की, हरियाणामध्ये गुलाबी बोंडअळीच्या संसर्गामुळे आणि शेतकऱ्यांनी रोपे उपटून टाकल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या अहवालानंतर उत्पादन एक लाख गाठींनी कमी केले आहे.
CAI नुसार, उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते. परंतु या तीन राज्यांतील उत्पादन गेल्या वर्षीच्या ४१.६६ लाख गाठींच्या तुलनेत ४०.६६ लाख गाठी असल्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये उत्पादन ७ लाख गाठींनी घटले आहे, तर पंजाब, लोअर राजस्थान आणि हरियाणामध्ये जास्त उत्पादन झाल्याची नोंद आहे.
त्याचबरोबर दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील पिकांनाही यावेळी फटका बसला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या ७२.९५ लाख गाठींच्या तुलनेत यंदा केवळ ६५.६० लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र, तामिळनाडूने कापूस उत्पादनात विक्रम मोडला आहे. या हंगामात ६.३६ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे, तर गतवर्षी ५.३१ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. त्याचप्रमाणे ओडिशा आणि इतर राज्यांमध्येही पीक कमी असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे एका गाठीमध्ये १७० किलो कापूस असतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.