Role of Forest Rights act in Conservation: राष्ट्रीय वननीतीनुसार देशातील पर्यावरण संतुलनासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किमान ३३ टक्के वन क्षेत्र गरजेचे मानले जाते. आपल्या देशात मात्र हा टक्का २४ ते २५ च्या आसपास तर महाराष्ट्र राज्यात तो २० ते २१ च्या पुढे जाताना दिसत नाही. सुमारे दशकभरापासून राज्यात वन क्षेत्र २० टक्के असल्याचे बोलले जाते. दरम्यानच्या काळात वाढते शहरीकरण, विकास कामांसाठीची अनियंत्रित वृक्षतोड वनपरिक्षेत्रातील कुरणे, गायरानांवरील अतिक्रमण या सर्वांच्या परिणामस्वरूप राज्यात वन क्षेत्राचा टक्का १४ ते १५ च्या आसपास असल्याचे यातील जाणकारांचे मत आहे..विकासकामांसाठी वनजमिनी देत असताना अधिग्रहित क्षेत्राच्या अथवा तोडलेल्या झाडांच्या दुप्पट-तिप्पट वृक्ष लागवड करण्याची अट आहे. शिवाय राज्यात वन क्षेत्र वाढीसाठी दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. परंतु या दोन्हीतीलही फोलपणा वारंवार दिसून येतो. प्रत्यक्ष उद्दिष्टाच्या खूप कमी वृक्ष लागवड होते. मागील दशकभरात लावलेल्या झाडांपैकी किती वाचली, हा संशोधनाचा विषय आहे..Forest Land Crisis: वनसंज्ञेमुळे संकट.वने व जैव विविधता हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. वन क्षेत्र नष्ट होत असल्याने त्यातील जैवविविधताही धोक्यात आली आहे. याचे गंभीर परिणाम महाराष्ट्र, देशच नव्हे तर जगाला भोगावे लागत आहेत. वाढती वृक्षतोड आणि घटत्या जंगलाच्या क्षेत्रामुळे सातत्याने तापमानवाढ होत आहे. तापमानवाढीमुळे एकंदरीत निसर्ग चक्र बदलले असून त्याचे पर्यवसान वाढत्या नैसर्गिक आपत्तीत होत आहे..यांत शेती क्षेत्राची अपरिमित अशी हानी होत आहे. वन्यप्राण्यांच्या मूळ अधिवासावर आपण आक्रमण केल्याने वाघ, बिबट्यांसह इतरही वन्यजीव-मानव संघर्ष वाढला आहे. राज्यात शेतमजूर-शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांच्या झालेल्या हल्ल्यात काहींना जीव गमवावा लागत आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान वाढले आहे. असे असताना इतर काही राज्यांच्या तुलनेत आपल्या वन क्षेत्राचा आकडा चांगला आहे, म्हणून वन विभागासह राज्य शासन घटत्या वनक्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असेल तर ही गंभीर बाब आहे..Vasola Forest Story: वासोळ्याच्या जंगलातील राजाराणी.वन कायदा सांगतो, की संरक्षित वनाच्या गाभ्यात (कोअर झोन) कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नको. परंतु वन विभाग आता तिथेही पर्यटन घडवून आणत आहे, अशावेळी ते संरक्षित वन कसे राहणार? आपल्याकडे संरक्षित, राखीव आणि खासगी असे तीन प्रकारचे वने आहेत. या तिन्ही वनांच्या संवर्धनासाठीचे नियम-कायदे वेगळे असून त्यांचे काटेकोर पालन व्हायला हवे. आपली वने, संरक्षित क्षेत्रे वाचवायची असतील निसर्ग पर्यटनाबाबत ठोस निर्णय घ्यावे लागतील..वनांमध्ये बेकायदेशीररित्या आयोजित केले जाणारे विविध महोत्सव, नाइट जंगल सफारी हे थांबले पाहिजे. हे करीत असताना शेतीसाठी असो की इतर कोणत्याही विकास कामांसाठी वन जमिनींचा वापर, त्यावरील अतिक्रमणे तसेच अनियंत्रित वृक्षतोड पूर्णपणे थांबवावी लागेल. राज्यात वन क्षेत्र तसेच वन क्षेत्राबाहेर वनीकरणाला मोठा वाव असून मोकळ्या जागी वृक्ष लागवड झाली पाहिजे..लावलेली वृक्ष जगविण्याचे प्रयत्न हे वन विभागासह गाव परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी देखील केले पाहिजे. शिवाय वन हक्क कायदा, लोकसहभागातून वन व्यवस्थापन ही गावांतील लोकांसह वन विभागाची सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेतल्यास राज्यात वनांचे संरक्षण-संवर्धन होईल. कृषी वनीकरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करून बांधावर, पडीक जागेत वन-फळ वृक्ष लागवड झाल्यास पर्यावरण संवर्धनाबरोबर शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.