डॉ . अश्विनी बन्सोड, डॉ. राजेश्वर खंदारेAnimal Health: पशुपालकांनी झूनोसिस आजाराच्या धोक्यांबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. आरोग्य, पशुपालन आणि शेती या सगळ्याच गोष्टी एकमेकींशी जोडलेल्या आहेत. योग्य माहिती, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय केल्यास झूनोसिस आजार टाळता येऊ शकतात.दिवसेंदिवस जनावरांच्या संपर्कामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढत आहे. झूनोसिस आजार हे प्राण्यांपासून मानवाला होतात. जनावरांपासून काही सूक्ष्मजंतूंमुळे अनेक गंभीर आजार माणसांना होऊ शकतात. बऱ्याचवेळा माणसांचा पाळीव श्वानाशी संपर्क येतो, परंतु त्यांना आजाराची लक्षणे माहिती नसल्यामुळे रेबीज सारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. मांस,दूध आणि अंडी उत्पादन घेताना विशेष काळजी घ्यायला हवी. .आजाराचे प्रकारब्रुसेलोसिसस्रोत: गाई, म्हशी, शेळी, मेंढीलक्षणे: ताप, थकवा, सांधेदुखी, स्त्रियांमध्ये गर्भपात.मानवामध्ये संसर्ग: जनावरांच्या दूध, वार, लाळ किंवा रक्ताचा संपर्क.रेबीजस्रोत: श्वान, माकड, मांजरलक्षणे: ताप, घाबरणे, पाण्याची भीती, मृत्यू संभवमानवामध्ये संसर्ग: चावा किंवा ओरखडा.Animal Disease: गाई, म्हशींमधील तिवा आजाराचे नियंत्रण.अँथ्रॅक्सस्रोत: गोवंश, मेंढीलक्षणे: त्वचेवर गाठ, ताप, श्वास घेण्यास त्रास.मानवामध्ये संसर्ग: संक्रमित जनावरांचे मृत शरीरास हाताळतानालेप्टोस्पायरोसिसस्रोत: उंदीर, जनावरांचे मूत्रलक्षणे: ताप, डोकेदुखी, कावीळसारखी लक्षणेमानवामध्ये संसर्ग: पाण्याद्वारे किंवा चिखलातून.टीबीस्रोत: गोवंशलक्षणे: दीर्घकालीन खोकला, थकवा, वजन कमी होणेमानवामध्ये संसर्ग: दूषित दूध किंवा संपर्कातूनटॉक्सोप्लास्मोसिसस्रोत: मांजर, शेळी, मेंढीमानवामध्ये संक्रमण: संक्रमित जनावरांचे मांस खाल्ल्याने, मांजरीच्या विष्ठेच्या संपर्कातूनलक्षणे: सौम्य ताप, स्नायू दुखणे, गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भाला धोकाजोखमीचे गट: गर्भवती स्त्रिया, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले लोक..Animal Disease : ‘लेप्टोस्पायरोसिस’चे नियंत्रण.क्रिप्टोस्पोरिडिओसिसस्रोत: गोवंश, वासरूमानवामध्ये संक्रमण: दूषित पाणी, जनावरांच्या विष्ठेच्या संपर्कातूनलक्षणे: अतिसार, उलटी, पोटदुखीधोका: लहान मुले, वृद्ध, वंचित आरोग्य असलेले लोकजिआर्डियासिसस्रोत: जनावरांचे विष्ठा किंवा दूषित पाणीलक्षणे: अतिसार, पोटदुखी, वजन कमी होणेप्रसार मार्ग: दूषित पाणी किंवा अन्न..प्रतिबंधात्मक उपायजनावरांची नियमित लसीकरण करावे.कच्चे दूध पिणे टाळावे; दूध उकळून वापरावे.प्रत्येक जनावराची वेळोवेळी तपासणी करावी.जनावरांच्या मृतदेहाला हात लावताना हातमोजे, मास्क वापरा.गोठ्यातील सांडपाण्याचा योग्य निचरा करावा.हात, पाय वारंवार साबणाने धुवावेत.पिण्याचे पाणी उकळून घ्यावे.अर्धवट शिजलेले मांस धोकादायक असते, त्यामुळे शिजवून खाणे गरजेचे आहे.गर्भवती महिलांनी आजारी जनावरांचा संपर्क टाळावा.लसीकरण व जनावरांची वैद्यकीय तपासणी वेळच्यावेळी करून घ्यावी..उपचारपशूतज्ज्ञांचा तातडीने सल्ला घ्यावा.शेण तपासणी, रक्त तपासणी, इएलआयएसए किंवा पीसीआर सारख्या प्रयोगशाळेतील चाचण्या, त्वचा चाचणी, एक्स-रे यासारख्या चाचण्या आवश्यक आहेत.रेबीज नियंत्रणासाठी वेळीच लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.ब्रुसेलोसिस व टीबीसाठी दीर्घकालीन अँटिबायोटिक्सचे उपचार करावेत.गर्भवती महिला आणि इम्युनो-कॉम्प्रोमाइज व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.गाभण काळाचे दिवस संपण्याआधी किंवा गाय, म्हैस व्यायल्यानंतर वार उघड्या हाताने पकडू नये. त्याची योग्य विल्हेवाट लावावी.- डॉ.राजेश्वर खंदारे ८४०८९०६४७८( लेखक पशूतज्ज्ञ आहेत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.