Akola News : यंदा कोरडवाहू पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कमी पावसाळा व परतीचाही पाऊस न आल्याने जमिनीतील ओल कमी झाली. परिणामी दिवाळीच्या काळातच कापसाचा हंगाम उतरणीला लागला. सिंचन क्षेत्रातील कपाशीच्या पिकावरही आता बोंड अळीचा परिणाम दिसून येत असून कवडी अधिक प्रमाणात निघते आहे.
या वर्षात पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस पडला. दरवर्षी येणारा परतीचा पाऊसही न आल्याने प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रातील कपाशी पिकाला फटका बसला आहे. पिकाची वाढ झाली. बोंड्याही लागल्या. मात्र आता कापूस वेचणी करताना बोंड अळीने केलेले नुकसान समोर येऊ लागले. शेतात कवडीचे प्रमाण वाढले आहे. दोन-तीन वेचण्यानंतरच पिकात उलंगवाडी होऊ लागली. एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंतही उत्पादन निघालेले नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.