Jayant Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : महायुती सरकारच्या चुका, भ्रष्टाचार जनतेपुढे मांडणार

Team Agrowon

Junnar News : महायुती सरकारच्या चुका व भ्रष्टाचार जनतेपुढे मांडण्यासाठी तसेच दलबदलू राजकारण करणारे, सर्वसामान्य माणसांच्या मनात विष कालवणारे व जाती-जातीत वाद लावणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यभर शिवस्वराज्य यात्रा आयोजित केली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेनिमित्त शुक्रवारी (ता.९) आयोजित सभेत पाटील बोलत होते.या वेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, अनंतराव चौगुले, शरद लेंडे, अंकुश आमले, बाजीराव ढोले, मोहित ढमाले, सूरज वाजगे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी जयंत पाटील म्हणाले, की महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर लोकप्रिय योजना बंद करणार असल्याचा अपप्रचार सत्ताधारी करीत आहेत. मात्र महायुती सरकारने विचार न करता ज्या योजना चालू केल्या आहेत, त्या भविष्यात महाविकास गाडीचे सरकार आल्यानंतर विचारपूर्वक चालवल्या जातील.

माजी गृहमंत्री देशमुख म्हणाले, की मोदी सरकारचे दर वर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ हे आश्वासन फोल ठरले आहे. महायुती सरकारने येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राज्यातील तिजोरी उघडली आहे, मात्र लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने जो महायुतीला धडा शिकवला तोच धडा जनता विधानसभेला देखील शिकविणार आहे.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, की कांद्याला ४० टक्के निर्यात शुल्कामुळे कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच दूध व शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये देशात सर्वांत जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT