Jitendra Awad : राज्यातील महायुती सरकार वास्तववादी भान असणारे नाही; आव्हाड यांची कॅगच्या अहवालानंतर टीका 

CAG Reports : भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) ने दिलेल्या अहवालानंतर आता राज्यातील महायुती सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
Jitendra Awad
Jitendra AwadAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी (ता. १२) विधीमंडळात जमा आणि खर्चाचा अहवाल पटलावर ठेवण्यात आला. यानंतर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) ने यावर अहवालातून ताशेरे आढले आहेत. त्यानंतर आता विरोधकांच्या निशाण्यावर राज्यातील महायुती सरकार आले आहे. कॅगच्या अहवालावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार असल्याचे म्हटले आहे. आव्हाड यांनी ही टीका शनिवारी (ता.१३) मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

कॅगने आपल्या अहवालात राज्याच्या जमा आणि खर्चातील तफावत असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षाचा आहे. सरकारच्या आर्थिक बेशिस्तीमुळे राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक ताण वाढत असल्याचे कॅगने म्हटले आहे. तसेच राज्याचे उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत वाढवावेत अशी शिफारस देखील कॅगने राज्य सरकारला केली आहे.  

Jitendra Awad
Monsoon Session 2024 : राज्याच्या जमा-खर्चात ताळमेळ नाही; 'कॅग'नं व्यक्त केली चिंता

यावरून राज्यातील महायुती सरकारला वास्तवाचे भान नसून कर्जात राज्य बुडत आहे. सध्या राज्यावरील कर्ज दुपट्टीने वाढल्याचा अहवाल कॅगने दिल्याचे आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळेच सरकारी तिजोरीवर भार वाढत असल्याचे कॅगने ताशेरे ओढत निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे राज्यातील महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारला वास्तवाचे भान नाही. हे सरकार वास्तववादी भान हरवलेलं सरकार असल्याचे आव्हाड म्हणाले. 

Jitendra Awad
Sharad Pawar : राज्यातील शेतकरी आणि कांदा प्रश्नावरून शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

पुढे आव्हाड म्हणाले की, राज्य सरकारकडून राज्यातील विविध संस्थांना ५०,००० कोटीचा निधी दिला गेला आहे. निधी कोणाला किती आणि कधी दिला याचा ताळमेळच कॅगला लागत नाही. जर कॅगलाच ताळमेळ बसत नसत नसेल तर सर्वसामान्य मराठी माणसाला तरी काय कळणार? असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. 

राज्याच्या तिजोरीतील ५० हजार कोटी गोरगरीब, कष्टकरी माणसाच्या खिशातले आहेत. जे विविध मंडळांना वाढण्यात आले. यावरूनच कॅगने निरीक्षण नोंदवले. मागील ६४ वर्षात आजपर्यंत असे कधीच झाले नसल्याने ही गंभीर बाब असल्याचे, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com