Nagar News : मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात केवळ सहा जागा विरोधकांना मिळाल्या होत्या. या वेळी परिस्थिती वेगळी आहे. किमान पन्नास टक्के म्हणजे चोवीसपेक्षा अधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील.
नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा आम्ही मोठ्या मतांनी जिंकू, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. भाजपबरोबर जायला आमची कधीही संमती नव्हती, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
नगर येथे शनिवारी (ता. २०) सकाळी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. नगर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, की भाजपचा चारशेपार नारा चुकीचा. दहा वर्षांत मी, नव्हे ते सत्तेवर आहेत.
त्या दहा वर्षांत त्यांनी नेमके काय केले. मी जेव्हा सत्तेवर होतो, त्या वेळी माझ्यावर असलेल्या जबाबदारीतून मी काय काम केले हे सगळ्या जगाला माहिती आहे. शरद पवारांनी नगर जिल्ह्यात काय केले, असा प्रश्न विखे पाटील उपस्थित करतात, असे विचारल्यावर शरद पवार म्हणाले, की जे लोक कधीही एका जागेवर नाहीत.
कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये तर कधा भाजपमध्ये असतात त्यांच्याविषयी फार बोलावे वाटत नाही. धनगर समाजाला सवलती मिळाव्यात याबाबत आम्ही सतत भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत सत्तेवर आल्यावर पहिल्यांदा धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे अश्वासन दिले होते.
हे सांगून आता आठ वर्षे झाली. केंद्रात व राज्यात सत्ता आहे. मात्र सरकारने भूमिका योग्य प्रकारे न्यायालयात मांडली नाही. त्याची किंमत आता धनगर समाजाला मोजावी लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळा व राज्य सहकारी बॅंकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला होता. केलेल्या आरोपाची चौकशी करावी. ज्यांच्यावर त्यांनी आरोप केला, त्यांना आज ते बरोबर घेऊन फिरत आहेत.
अजूनही वाटते आंबेडकरांनी सोबत यावे
शरद पवार म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसमवेत यावे. त्यासाठी अनेक बैठका झाल्या, परंतु दुर्दैवाने जुळले नाही. मात्र आम्हाला अजूनही वाटते की, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.