Yavatmal News: पाझर तलावासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागावर जप्तीची नामुष्की आणली. न्यायालयाच्या आदेशानंतरही मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयातील खुर्च्या, संगणक व इतर साहित्य ताब्यात घेतल्याची घटना घडली..दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाण येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांच्या १७ एकर शेती पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शेतकऱ्यांना मूळ रक्कम व व्याजासह सुमारे ५५ लाख ३० हजार रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र दीर्घकाळ उलटूनही मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जप्तीची कारवाई केली..MP Bhaskar Bhagre: सहकारी बँकांच्या संचालकांच्या नव्या निकषांबाबत पुनर्विचार व्हावा.दरम्यान, विभागाने या प्रकरणी उच्च न्यायालयात अपील दाखल केले असल्याचे सांगत मोबदला देण्यास विलंब होत असल्याचे कारण दिले. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही मोबदला न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने जप्तीची कारवाई केली. या कारवाईदरम्यान जिल्हा जलसंधारण अधिकारी आनंद पांडे यांच्या कार्यालयातील खुर्च्या, कपाट, संगणक व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले..Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे.कारवाईदरम्यान मोबदला मिळाल्यानंतर जप्त केलेले साहित्य परत करण्यात येईल, अशी हमी शेतकरी सुधीर चव्हाण यांनी दिली. दुसरीकडे, न्यायालयाच्या आदेशानुसार मोबदला देण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्याची मागणी विभागाने केली होती. मात्र मोबदल्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याने शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्यास नकार दिला..दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाची मोठी नामुष्की झाल्याची चर्चा सुरू असून शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना योग्य व वेळेवर मोबदला देण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.