Vidarbha Lok sabha 2024 : विदर्भात धाकधूक वाढली; दुपारपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

Lok sabha Election 2024 : देशभरात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत आहे.
Vidarbha Lok sabha 2024
Vidarbha Lok sabha 2024agrowon

Vidarbha Election Voting : देशभरात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदार मतदान होत आहे.

दरम्यान अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. दरम्यान सकाळपासून दुपारी तीन पर्यंत ४४.१२ टक्के मतदान पार पडल्याची माहिती मिळाली.

विदर्भातील रामटेक आणि नागपूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची निवडणूक होणार असे पहिल्यापासून बोलले जात होते. याची खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैणात केला होता. काही मतदान केंद्रांवरील किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता कोणतीही मोठी घटना न घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम बंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील ५ मतदार संघांत सकाळी ७ वाजेपासून सुरू झाले आहे. यात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४४.१२ टक्के मतदान झाले आहे.

मतदारसंघनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे

रामटेक - ४०.१० टक्के

नागपूर - ३८.४३ टक्के

भंडारा- गोंदिया - ४५.८८ टक्के

गडचिरोली- चिमूर - ५५.७९ टक्के

चंद्रपूर - ४३.४८ टक्के मतदान पार पडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com