Water Resource Department Agrowon
ॲग्रो विशेष

Water Resources Internship: जलसंपदा विभागात ‘इंटर्नशिप’ला मान्यता; विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष अनुभव!

Student Internship Program: राज्यातील जलसंपदा विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये सिंचन नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी ‘आंतरवासिता’ (इंटर्नशिप) करण्यास आता मान्यता देण्यात आली आहे.

मनोज कापडे

Pune News: राज्यातील जलसंपदा विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये सिंचन नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी ‘आंतरवासिता’ (इंटर्नशिप) करण्यास आता मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना राज्यातील जलसंपदा विभागाचे सर्व प्रकल्प, उपसा जलसिंचन योजना, जलनियोजन, जलहवामान, पर्जन्य, सिंचन व्यवस्थापन, प्रकल्प आरेखन याची माहिती व्हावी व तेथे अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिपला मान्यता द्यावी, असा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पाठवला होता.

जलसंपदा विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. अर्थात, हा प्रस्ताव मंजूर करताना काही अटीदेखील टाकण्यात आल्या आहेत. राज्यातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाच्या केवळ (बीई किंवा बी-टेक) तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षातील विद्यार्थी या सवलतीस पात्र असतील. तसेच, मान्यताप्राप्त विद्यापीठात अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवी (एमई किंवा एमटेक) च्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विद्यार्थीही ‘इंटर्नशिप’ करू शकणार आहेत.

जलसंपदा विभागाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आता ‘मेरी’ अर्थात महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेसह मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सीडीओ) तसेच जलविज्ञान व धरण सुरक्षितता संघटना (डीएसओ) या प्रख्यात तीन संस्थांची दारे खुली झाली आहेत. राज्याच्या सिंचन नियोजनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थांमधील कामकाजाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी आता मिळते आहे.

गोपनीय माहिती उघड केल्यास कारवाई

धरण सुरक्षितता तसेच जलसंपदा विभागातील विशिष्ट कामकाज गोपनीय स्वरूपाचे असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही गोपनीयता पाळावी लागणार आहे. जलसंपदा विभागाशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती उघड केल्यास विद्यार्थ्यांसह शिक्षण संस्थेवरदेखील कारवाई केली जाईल, अशी कठोर अट या उपक्रमात टाकण्यात आली आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई

जलसंपदा विभागाशी संबंधित कोणत्याही संस्थेत इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यास माध्यमाशी संपर्क करण्यास मनाई घालण्यात आली आहे. तसेच, मान्यता न घेता जलसंपदा विभागातर्फे संबंधित विद्यार्थी कोणत्याही त्रयस्थ पक्षाशी संवाद साधणार नाही किंवा माहिती देऊ शकणार नाहीत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT