Farmers Protest: ‘ती’ जमीन शेतकऱ्यांना परत द्या; स्वाभिमानी संघटनेची मागणी
Solar Project: निम्न दुधना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी सुरू झाल्याने परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडक देत जमीन परत देण्याची मागणी केली.