Water Resources : सार्वजनिक जलस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण

Clean Water : जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. यासाठी स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
Water Resources
Water ResourcesAgrowon
Published on
Updated on

Palghar News : जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. यासाठी स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या सर्वेक्षणातून स्रोताभोवतीचा परिसर, पाणीपुरवठा संरचना व व्यवस्थापनातील जे काही दोष आढळून येतात, त्यांचे निराकरण वेळेत करता येऊन जलजन्य आजार, साथींना प्रतिबंध करता येतो.

सर्वेक्षण गुणवत्तापूर्वक झाल्याने जिल्ह्यातील पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या साथींना आळा घालणे शक्य होईल, याकरिता पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी हे जलस्रोतांचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे धोरण सरकारने निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने जलस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण हे पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोनवेळा केले जाते.

Water Resources
Water Resources Department : वाढीव दहा वक्राकार दरवाजांना हिरवा कंदील

पावसाळ्यानंतर २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता सर्वेक्षण मोहीम सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत द्वितीय वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक धनराज पांडे यांनी दिली.

लाल रंगाचे कार्ड देण्याचे नियम

ज्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी शुद्धीकरण अनियमित होते, स्त्रोताचा परिसर अस्वच्छ आहे, नळ, तसेच वॉल्व गळती आहे, ग्रामपंचायतीला टीसीएल पावडरचा पुरेशा प्रमाणात व योग्य गुणवत्तेचा साठा उपलब्ध नाही, वर्षभरात जलजन्य साथरोगाचा उद्रेक झाला आहे, अशा ग्रामपंचायतींना स्वच्छता सर्वेक्षणात तीव्र जोखीम म्हणून लाल रंगाचे कार्ड दिले जाते.

Water Resources
Water Resource Department : जलसंपदा विभागाच्या १२५ प्रकल्पांसाठी ८० हजार कोटींची प्रशासकीय मान्यता : मुख्यमंत्री शिंदे

हिरवे कार्ड देण्याचे प्रमाण

लाल रंगाचे कार्ड देण्याचे निकष, दोष ज्या ग्रामपंचायतीमध्ये आढळून येत नाहीत, त्यांना हिरव्या रंगाचे कार्ड दिले जाते.

पिवळ्या रंगाचे कार्ड देण्याचे निकष

गावांमध्ये अस्वच्छता आढळून येते, तसेच स्वच्छता सर्वेक्षणात मध्यम जोखीम म्हणून स्रोत निश्चित केलेला असल्यास पिवळे रंगाचे कार्ड दिले जाते.

सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या स्रोतांची संख्या

डहाणू २६७

जव्हार ३५३

मोखाडा २१४

पालघर २७६

तलासरी १३८

वसई ७०

विक्रमगड १९६

वाडा ४८४

एकूण १,९९८

...असे मिळणार चंदेरी रंगाचे कार्ड

सलग पाच वर्षे साथीचा उद्रेक न झालेल्या आणि पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेल्या असे दोन्ही निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड देण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com