Nana Patole  Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : 'सोयाबीन, कापसाला काय भाव मिळाले हे आठवूनच मतदान करा', पटोले यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला ६ दिवस उरले आहेत. या दरम्यान महायुतीसह महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. महायुतीवाले सतत आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचे सांगत असतात. मात्र भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनो मतदान करताना, सोयाबीन, कापसाच्या भावाची आठवण ठेवा, राज्यात मविआचे सरकार आल्यास हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ते आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस मविआचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी येथे सभेत बुधवारी (ता.१३) बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल मानकर, ख्वाजा बेग, प्रवीण देशमुख, भरतभाऊ राठोड, गणेश मुत्तेमवार, सतीश भोयार, शंकरराव ठाकरे, मनिष डागले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पटोले यांनी, केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. गेल्या १० वर्षात केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, शेतमालाला हमीभाव देऊ, अशी आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. राज्यातील सोयाबीन आणि कापूसचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका केली आहे.

सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये असून पण बाजारात ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने शेतकऱ्याला सोयाबीन विकावे लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबिनला ६,००० रुपये भाव देण्याचे आश्वासन २०१४ आणि २०१९ लाही दिले होते. काय झाले त्या आश्वासनाचे असा सवाल पटोले यांनी केला आहे.

कापसालाही सध्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असून या भावात शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघत नाही. भाजपाच्या सुलतानी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करताना सोयाबीन व कापसाच्या भावाची आठवण करा व मगच मतदान करा, असे आवाहन पटोले यांनी केले. तसेच मविआचे सरकार आल्यानंतर सोयाबीन, कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ, असे आश्वासनही पटोले यांनी दिले आहे.

यावेळी पटोले यांनी भाजपवर बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ है, व्होट जिहाद यासारख्या घोषणांवरून देखील जोरदार निशाना साधला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर भाजप फूट पाडत आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना बटेंगे तो कटेंगे असे नारे देत आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिक आहेत. ज्यांच्यावर आम्ही नाही तर भाजपनेच दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केला होता. त्यांना जेलमध्ये टाकले होते.

सत्तेसाठी उद्या भाजप कुख्यात माफिया दाऊदलाही निवडणुकीत उमेदवारी देतील. मग काय याला सत्ता जिहाद म्हणायचे का? भाजपकडून ‘व्होट जिहाद’चा नारा दिला जात असून लोकशाही व संविधान त्यांना मान्य नाही. ते मतदारांचा अपमान करत आहेत, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patole : नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा? ; राहुल गांधी यांची घेणार भेट

Indian Politics : इंडिया आघाडीसह मित्रपक्षही महायुतीच्या विजयाने बेचैन

Import Policy : आयातीचे घातक धोरण

Parliament Winter Session 2024 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, अदानी, वक्फ विधेयकामुळे विरोधक आक्रमक होणार?

Onion Crop : आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात

SCROLL FOR NEXT