Rahul Gandhi : भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी निराश : राहुल गांधी

Maharashtra Politics : सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकरी हताश आणि निराश झाल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस हमीभावापेक्षा कमी दराने विकावे लागत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकरी हताश आणि निराश झाल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांनी भाजप आणि महायुती सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, गोंदियातील जाहीर सभेतही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात, पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड; बुलडाणा दौरा रद्द, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आवाहन

देशातील मूठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षांत एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

Rahul Gandhi
Maharashtra Politics : ‘मविआ’चे नेते एकमेकाला हरविण्यासाठी प्रयत्नशील

सभेनंतर लगेचच त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना राज्य सरकारने निराश केल्याची टीका केली. पोस्टमध्ये म्हटले आहे, की २०२१ मध्ये सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल १० हजार रुपये होता. पण आता हमीभावापेक्षाही कमी दराने ते विकावे लागत आहे. सोयाबीनला किमान हमीभाव ४८९२ रुपये आहे, तर शेतकऱ्यांना ते ४२०० रुपयांना विकावे लागत आहे.

काही शेतकऱ्यांना तर यापेक्षाही कमी किंमत मिळत आहे त्यामुळे ते हताश झाले आहेत. महाविकास आघाडी शेतकऱ्यांचे दुःख समजू शकते. आमचे सरकार योग्य भाव देण्याचा मार्ग शोधून काढेल.’’ ‘‘मी मंगळवारी झूम ॲपद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी मी त्यांना आश्‍वासन दिले आहे, की आमचे सरकार सत्तेत आल्यास ‘कृषी समृद्धी’अंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी दिली जाईल. तसेच महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ३००० रुपये दिले जाणार आहेत,’’ असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com