Nana Patole : मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, काय झालं 'चाय पे चर्चा' वेळी दिलेल्या आश्वासनांचे? : नाना पटोले

Maharashtra Assembly Election 2024 : यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपला आपला पराभव दिसू लागल्यानेच ते हिंदू-मुस्लीम असा भेद करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात एकीकडे महागाई वाढली असून दुसरीकडे शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतकरी होरपळत आहे. शेतकरी आपल्या पिकास हमीभावाची मागणी करत आहे. मात्र भाजपच्या नेत्यांना महागाई, बेरोजगारी, शेतकरी दिसत नाही. ते त्यांच्यावर बोलत नाहीत. भाजपवाल्यांना आपला यंदा पराभव दिसत असल्यानेच फक्त हिंदू-मुस्लीम करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे प्रचार सभेत बोलत होते.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे महविकासाघडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेतून पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सध्या राज्यातील महत्वाच्या प्रश्नांपेक्षी भाजप नेत्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा महत्वाच्या वाटू लागल्या आहेत.

Maharashtra Assembly Election 2024
Nana Patole : महायुती सरकारमुळे फक्त ‘लाडका उद्योगपती’ व ‘लाडके कंत्राटदार’च मालामाल; शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल : नाना पटोले

भाजपच्या अशा घोषणा जनतेची दिशाभूल करणाऱ्या असून याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजप युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहनही पटोले यांनी यावेळी केले. तसेच मविआ जिंकली तर दिल्लीतीलही मोदींची सत्ताही जाईल, असा ठाम विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पटोले यांनी मोदी यांच्या २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारातचा दाखला देताना, मोदी यांना आता आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकी वेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला हमीभाव देऊ असे म्हटले होते.

Maharashtra Assembly Election 2024
PM Modi And Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी, राहुल गांधींच्या प्रचार तोफा धडाडणार; मोदींची पुण्यात, राहुल गांधी यांची बुलडाण्यात सभा

तर सत्तेत आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर असेल असेही आश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यावर आता मोदींना आपलेच चुनावी जुमले आठवत नाहीत. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून फडणवीसही आता मोदींसारखेच शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

फडणवीस सत्ता द्या शेतमालाला हमीभाव देण्यासह कर्जमाफीची घोषणा करत आहेत. ११ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदी आणि मागील ७.५ वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. मग याकाळात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने का पाळली नाहीत? असा सवाल देखील त्यांनी केली आहे.

यामुळे आता बळीराजाला खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करू नका. आता शेतकरी भाजपच्या या थापेबाजाली बळी पडणार नाही. महायुती सरकारने राज्याला संकटात लोटले असून महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचे पाप शिंदे, फडणवीस व अजित पवार यांनी केल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com