Maharashtra Assembly Election 2024 : छाननीत ९१७ अर्ज अवैध; लोकसभेच्या तुलनेत राज्यात ५० लाख मतदारांची भर

Vidhansabha Election 2024 : यंदा विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत राज्यात ५० लाख मतदारांची भर पडली आहे. ज्यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अंतिम मुदत २९ ऑक्टोबर होती. यावेळी ७ हजार ९६७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची बुधवारी (ता. ३०) छाननी झाली. यावेळी ९१७ अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत ५० लाख मतदारांची भर पडल्याची माहिती देखील आयोगाने दिली आहे.

राज्यात २८८ मतदारसंघासाठी निवडणूक होत असून शेवटच्या दिवसापर्यंत ७ हजार ९६७ उमेदवारांनी १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज भरले होते. यापैकी छाननीत आयोगाने ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले असून ९१७ अर्ज बाद झाले आहेत. तर ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. या मुदतीपर्यंत महायुतीसह महाविकास आघाडीकडून बंडखोरांचे बंड शमवण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. तर ४ तारखेनंतरच किती उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक मैदानात असणार हे कळणार आहे.

Vidhansabha Election 2024
Maharashtra Assembly Election : राज्यात ७९९५ उमेदवारांचे १० हजारांवर अर्ज दाखल

लोकसभेच्या तुलनेत ५० लाख मतदारांची भर

दरम्यान लोकसभेच्या तुलनेत ५० लाख मतदारांची भर यंदा पडली असून विधानसभा निवडणुकीसाठी ९ कोटी ७० लाख मतदार नोंदणी झाली आहे. सर्वाधिक मतदार पुणे जिह्यात असून नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत मतदार नोंदणीत वाढ झाली आहे. येथे महिला मतदारांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक आहे.

७ लाख नवीन मतदारांनी नोंद

निवडणूक आयोगाने याआधी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ४ कोटी ९७ लाख पुरुष, ४ कोटी ६६ लाख महिला आणि ६ हजार ३१ तृतीयपंथी मतदार होता. यानंतर आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली. या काळात ७ लाख नवीन मतदारांनी नोंद झाली आहे.

Vidhansabha Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा ४० लाख; जेवन, चहासह इतर खर्चाचा हिशोब उमेदवाराला द्यावा लागणार

लोकसभेवेळी राज्यात ९ कोटी २० लाख मतदार होते. या तुलनेत विधानसभेला सुमारे ५० लाख मतदार वाढले आहेत. यात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या २२ लाख २२ हजार आहे. १ लाख १६ हजार सेनादलातील मतदार असून १०० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या ४७ हजार ३९२ आहे. यात ६ लाख ४१ हजार विकलांग असून ठाणे जिह्यात १ हजार ४१५ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.

महिला मतदारांची संख्या जास्त असणारे जिल्ह्ये

नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चार जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. सर्वाधित ८८ लाख ४९ हजार महिला मतदार पुणे जिह्यात आहेत. त्या खालोखाल ७६ लाख २९ हजार मतदार मुंबई उपनगर, ७२ लाख २९ हजार मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. तर सर्वांत महिला मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून ते ६ लाख ७८ हजार आहेत.

१५ दिवसांत १८७ कोटींची मालमत्ता जप्त

दरम्यान आचारसंहिता असतानाच राज्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आचारसंहिता लागल्यापासून १५ दिवसांत (१५ ते ३० ऑक्टोबर) करण्यात आली आहे. यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूंचा समावेश आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस, इन्कमटॅक्स, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com