Maharashtra Kesari Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीचा प्रारंभ

Maharashtra Kesari Kusti Spardha : फुलगाव, ता. हवेली येथे ६६ व्या वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीचा प्रारंभ मंगळवारी (ता. ७)सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Team Agrowon

Maharashtra Kesari News : महाराष्ट्राच्या मल्लांनी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत खेळावे, यासाठी त्यांना अधिकाअधिक सराव मिळून देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन यापुढील काळात करण्यात येईल, असे सांगून महाराष्ट्रातील मल्लांना आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेसारखे मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यास त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल, असाही विश्वास या वेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.

६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीचा प्रारंभ मंगळवारी (ता. ७) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल, हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्यांच्या उपस्थितीत झाला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर सुरू आहे.

स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार तडस यांच्यासह स्वागताध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पै. विलास कथुरे, ऑलंपियन पै. नरसिंग यादव, हिंदकेसरी पै. योगेश दोडके, भारत केसरी पै. विजय गावडे, आशियाई सुवर्ण विजेते पै. रवींद्र पाटील, महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी पै. सईद चाऊस, मुंबई महापौर केसरी आबा काळे, उपमहाराष्ट्र केसरी - रवींद्र पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Industry Target: पुणे जिल्ह्यातील कृषी उद्योगाचे १२ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट

APMC Contribution Waiver: दुष्काळी बाजार समित्यांचे अंशदान माफ करा : सोमवंशी

US Import Ban: कॅनडाच्या उत्पादनांवर अमेरिकेची बंदी

Farmer Diwali Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार : बावनकुळे

Maharashtra Sugar Industry: एक नोव्हेंबरनंतरच साखर कारखाने सुरू करा: इंडियन इरिगेशन फेडरेशनची मागणी

SCROLL FOR NEXT